कोरोनामागे चीनच असल्याचा संशय, पाहा चीननं कसा कपटीपणा केलाय....

साम टीव्ही
बुधवार, 6 मे 2020
  • जगाला अंधारात ठेवून चीननं काय केलंय बघा
  • ही बातमी बघून तुम्हालाही धक्का बसेल
  • कोरोनामागे चीन असल्याच्या संशयाला बळ

कोरोनाचं संकट येण्याआधी चीननं अचानक आयात-निर्यात धोरण बदललं... आणि संपूर्ण जगालाच  कोरोनाच्या संकटात ढकललं. चीननं आयात-निर्यात धोरणातून जगाला कसं फसवलंय?

गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलंय. कोरोनाची सुरूवात चीनमधून झाल्याने आणि चीनने त्याबाबत नेहमीच चापलुसी केल्यानं चीनकडे संशयाने पाहिलं जाऊ लागलंय. त्यातच आता जी माहिती समोर आलीय त्यातून चीनचाच हात कोरोनामागे असल्याच्या संशयाला बळ मिळतंय. कारण कोरोनाचं संकट येण्याआधी काही महिने चीननं आयात आणि निर्यातीचं धोरण बदललं होतं. अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांनी दिलेले आकडे धक्कादायक आहेत.
जगाला संकटात ढकलणाऱ्या चीनची चापलुसी बघा
कोरोनाचं संकट येण्याआधी चीननं आयात वाढवून निर्यात मात्र कमी केली होती. चीननं वैद्यकीय साहित्यांसोबतच अत्यावश्यक वस्तूंचा साठा केला. त्याचसोबत निर्यात कमी करून इतर देशांत मात्र अशा वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल अशी व्यवस्था केली. फेस मास्क, सर्जिकल गाऊन आणि कोरोनाविषयक आवश्यक औषधांची आयात चीनने अचानक वाढवली होती. मात्र त्याचसोबत चीनने या वस्तू इतर देशांना पाठवणं कमी केलं होतं

चीननं केलेली ही चापलुसी आता लपून राहिलेली नाही. कोरोनाचं संकट आल्यापासून चीननं अनेकदा या बोटावरची थुंकी त्या बोटावर असले फसवणुकीचे उद्योग केलेत. त्यातच आयात-निर्यातीचे केलेले खेळ चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत. त्यामुळे संपूर्ण जगाला कोरोनाच्या दरीत ढकलून गंमत बघणाऱ्या चीनला धडा शिकवायलाच हवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live