पुन्हा जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

पुन्हा जोरदार सरी कोसळण्याची शक्यता


राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसऴण्याची शक्यताआहे . भारतीय हवामान विभागाने मान्सून माघारी गेला आहे, असे जाहीर करूनही राज्यात अजूनही पाऊस ठाण मांडून बसला आहे.

पूर्वमध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वात स्थिती येत्या ४८ तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात सोमवारपर्यंत तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे बुधवारपर्यंत, पुण्यात मंगळवारपर्यंत, मराठवाड्यात उस्मानाबाद, बीड येथे उद्या, सोमवारपर्यंत तर औरंगाबादमध्ये आज, रविवारी मेघगर्जना, विजा आणि जोरदार वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तेव्हा ढगही दिसू लागतात. मात्र मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.बंगालच्या उपसागरात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे, तसेच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथे बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर या विभागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज आहे. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले, तरी याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता नाही, तसेच हे क्षेत्र किनारपट्टीपासून लांब असल्याने फार धोका नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले 

Web Title heavy rain alert in mumbai and other cities
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com