'या' कंपनीत आहे चार दिवसांचा आठवडा; उत्पादकतेत 40 टक्के वाढ

'या' कंपनीत आहे चार दिवसांचा आठवडा; उत्पादकतेत 40 टक्के वाढ

टोकियो: शनिवार आणि रविवार सुट्टी अर्थात पाच दिवसांचा आठवडा, हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न असते. काही खासगी कंपन्यांमध्ये पाच दिवस आठवडा ही संकल्पना राबविली जाते. मात्र सरसकट तिची अंमलबजावणी केली जात नाही. अशावेळी तुम्हाला आठवड्यात फक्त चारच दिवस काम करायला सांगितले तर? होय, ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने जपानमधील कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा ही संकल्पना प्रयोगिक तत्वावर राबविली आणि विशेष म्हणजे कंपनीच्या उत्पादकतेत चक्क 39.9 टक्क्यांची वाढ झाली.

‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने जपानमधील 2 हजार 300 कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क लाईफ चॉइस चॅलेंज समर 2019’ अंतर्गत हा प्रयोग राबविला. यानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ चारच दिवस काम करावे लागते. शनिवार-रविवारला जोडून शुक्रवारीही हक्काची साप्ताहिक रजा देण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांनी देखील मन लावून काम केले. परिणामी कंपनीच्या उत्पादकतेत तर वाढ झालीच. याशिवाय नेहमीच्या तुलनेत 23.1 टक्के कमी वीज वापरल्याने तो खर्चही वाचला.

जपानमधील ‘वर्क कल्चर’ हे काहीसं अतिरेकी मानले जाते. म्हणजेच बहुसंख्य कर्मचारी स्वतःला कामात झोकून देतात. वर्क लाईफ बॅलन्स नसल्यामुळे बहुतेक जण अतिरिक्त वेळ थांबूनही आपले काम पूर्ण करतात. साहजिकच त्याचा कामावर परिणाम होतो. गुणवत्तापूर्ण काम होण्यासाठी कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती देखील चांगली असणे गरजेचे आहे. त्यामुळे या संकल्पनेला कमर्चाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

Web Title: Microsoft Japan tested a four-day work week

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com