Railway | पश्‍चिम रेल्वेवर तब्बल 40 दिवसांचा ब्लॉक

Railway | पश्‍चिम रेल्वेवर तब्बल 40 दिवसांचा ब्लॉक

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी 40 दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. 13 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर या काळात मध्यरात्री 1.25 ते पहाटे 5.25 वाजेपर्यंत विरार दिशेकडील धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल; त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 

मार्गात बदल 

पहाटे 4.15 ची चर्चगेट-विरार लोकल, तसेच पहाटे 4.19, 4.38, 4.46, 5 या चर्चगेट-बोरिवली लोकल मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. या लोकल महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड या स्थानकांत थांबणार नाहीत. 

रद्द करण्यात आलेल्या लोकल 

पहाटे 5.06 वाजता : महालक्ष्मी ते भाईंदर. 
पहाटे 5.20 : महालक्ष्मी ते बोरिवली. 
सकाळी 6.07 : बोरिवली ते चर्चगेट. 
सकाळी 6.27 : बोरिवली ते चर्चगेट.  

web title : About 40 days block on Western Railway

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com