T20 World Cup मधील पराभवानंतर BCCIचं मोठा निर्णय; कुणाची दाखवला बाहेरचा रस्ता?

टीम इंडियाचे मेंटर कंडिशनिंग कोच पॅडी अॅप्टन यांचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
BCCI
BCCISaam TV

मुंबई : T20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर बीसीसीआयने टीम इंडियात अनेक फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. आता याबाबत बीसीसीआयने मोठं पाऊल उचललं आहे. बीसीसीआयने आता टीम इंडियाचे मेंटर कंडिशनिंग कोच पॅडी अॅप्टन यांचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

विश्वचषकापूर्वीच अप्टन यांची भारतीय संघाचे कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता त्यांचा करार न वाढवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

BCCI
FIFA World Cup 2022 : 'फिफा'मध्ये हायव्होल्टेज 'तडका', अखेरच्या क्षणी २ गोल डागून इराणनं सगळ्यांनाच केलं हैराण

जुलैमध्ये जेव्हा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने मेंटर कंडिशनिंग कोचची मागणी केली तेव्हा अॅप्टन भारतीय संघाशी जोडले गेले. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापासून त्यांनी संघासोबत काम करण्यास सुरुवात केली, परंतु विश्वचषकादरम्यान त्याच्यावर खूप टीका झाली.

अॅप्टन यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी बोर्डाने निवड समिती बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांच्यासह अनेकांना बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

BCCI
FIFA World Cup 2022 : रिकार्लिसनच्या रिव्हर्स गोलची जगभर चर्चा; फुटबॉल समजत नसेल तरी VIDEO पाहून तोंडून वाह निघेल

अॅप्टन यांचा भारतीय संघासोबतचा दुसरा कार्यकाळ चांगला नसला तरी पहिल्या कार्यकाळात ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले. 2008 ते 2011 दरम्यान, अॅप्टनने भारतीय संघासोबत काम केले आणि 2011 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. 53 वर्षीय अॅप्टन यांची संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी स्वतः निवड केली होती. अॅप्टन आणि द्रविड यांनी राजस्थान रॉयल्ससाठी कोचिंग स्टाफ म्हणून एकत्र काम केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com