जेजे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशीही सुरूच 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 मे 2018

जेजे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. संप मिटवण्याच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा झाली असली तरी जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहिल अशी प्रतिक्रिया निवासी डॉक्टरांनी दिलीय. दरम्यान तिसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरूच होता. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल काही संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. शनिवारी रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी दोन ड़ॉक्टरांना बेदम मारहाण करत, रुग्णालयातल्या साहित्याची नासधूस केली होती. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारलंय.

जेजे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. संप मिटवण्याच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा झाली असली तरी जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहिल अशी प्रतिक्रिया निवासी डॉक्टरांनी दिलीय. दरम्यान तिसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरूच होता. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल काही संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. शनिवारी रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी दोन ड़ॉक्टरांना बेदम मारहाण करत, रुग्णालयातल्या साहित्याची नासधूस केली होती. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारलंय. दरम्यान, जे जे हॉस्पिटलच्या डीन ऑफिसबाहेर निवासी डॉक्टरांनी ठिय्या मांडलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live