टाळेबंदीत माकडांना जगताप कुटुंब देत आहेत मदतीचा हात !

दिलीप कांबळे
रविवार, 2 मे 2021

मंदिरे, खाण्याची दुकाने सर्व बंद असल्यामुळे त्यांना खाण्यासाठी भेटत नाही. त्यावेळेस मुक्या प्राणी कुठं जातेत हा प्रश्न आपल्याला सर्वांना पडतो. परंतु जुना पुणे मुंबई महामार्ग वरील लोणावळ्यातील जवळील एक दाम्पत्य या मुक्या प्राण्यांची जेवणाची सोय करीत आहे.

लोणावळा:  टाळेबंदीत माणसांची उपासमार होत आहे. पण त्यांच्या जेवणाची सोय कोणीही करतो. लॉकडाऊनचा परिणाम मुक्या प्राण्यांवर देखील होतो. मंदिरे, खाण्याची दुकाने सर्व बंद असल्यामुळे त्यांना खाण्यासाठी काही भेटत नाही. परंतु जुना पुणे मुंबई महामार्ग वरील लोणावळ्यातील एक दाम्पत्य या मुक्या प्राण्यांची जेवणाची सोय करीत आहे. The Jagtap family is giving a food to many animals in lonavala

राजमाची पाॅईंट खंडाळा ते अमृतांजन पाॅईंट येथील वन्यप्राणी, माकडांची या टाळेबंदीत उपासमार होऊ नये म्हणून बाळू जगताप दाम्पत्य स्वतः पोटाला चिमटा देऊन मुक्या प्राण्यांच्या जेवणाची सोय करत आहे. या माकडांना रोज केळी, कलिंगड आणि अन्य फळांची जणू काही मेजवानीच खायला मिळत आहे. बाळू जगताप हे वडापावची गाडी लावायचे, मात्र लॉकडाऊन मध्ये तीही बंद करावी लागली. कशी तरी पैश्याची तजबीज करून खोपोली वरून फळे आणून या माकडांची स्वखर्चाने पोटा पाण्याची सोय ते करतात. असे चित्र सध्या दिसून येतं आहे.

सध्या पर्यटन स्थळ बंद आहेत. त्यामुळे कोणीही पर्यटक इथे फिरकत नाहीत. यामुळे या प्राण्यांची उपासमार होत होती. तर दुसरीकडे लोणावळ्यात भटक्या कुत्र्यासाठी लोणावळा नगरपालिका आणि सिने तारका आयेशा जुल्का यांच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे. मात्र पर्यटन नगरीतील मुख्य आकर्षण असलेल्या या माकडांना कोणी वाली नव्हता. 

परंतु बाळू जगताप यांनी माणूसकी जपत या प्राण्यांना अन्नदान केल आहे. तरी कोणी पशुप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, किंवा संस्था यांनी पुढे येऊन या माकडांची जबाबदारी स्वीकारावी यांना जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन जगताप यांनी केले आहे. जर आपल्या समाजात जगताप सारखे  दाम्पत्य असेल तर कितीही लॉकडाऊन लागले तरी मुक्या जनावरांना मरण नाही हे हि तितकंच खरं आहे.

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live