महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना! कुऱ्हाडीनं गळा चिरून 4 चिमुकल्यांची हत्या 

साम टीव्ही
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

 

  • चिमुकल्यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला 
  • कुऱ्हाडीनं गळा चिरून चौघांची हत्या 
  • अंधश्रद्धेतून बळी घेतल्याचा संशय 

जळगावातल्या एका घटनेनं सारा महाराष्ट्र हादरलाय. अज्ञात व्यक्तीनं एकाच घरातील चार चिमुकल्यांची हत्या केलीय. ही हत्या अंधश्रद्धेतून झाली की, इतर कोणत्या कारणानं याचा आता पोलिस शोध घेतायेत.

जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील बोरखेडा गावातल्या एका घटनेनं सारा महाराष्ट्र हादरलाय. इथं एकाच कुटुंबातील चार इवल्याशा जिवांची कुऱ्हाडीनं वार करून हत्या करण्यात आलीय. 

सुमन उर्फ नानी (वय ३ वर्ष)
अनिल भिलाला (वय ८ वर्ष)
रावल भिलाला (वय ११)
सईता भिलाला (वय १२)  
 

पाहा यासंदर्भातील व्हिडिओ -

अशी या मरण पावलेल्या मुलांची नावं आहेत. बोरखेडा शिवारात शेतातल्या एका घरात ही चारही मुलं आई-वडील माहताब आणि रूमलीबाई सोबत राहत होती. आई वडिल मध्य प्रदेशातल्या मुळगावी गेले असता काही अज्ञात लोकांनी घरात घुसून चौघा मुलांची हत्या केली. मेहताब भिलाला हे शेख मुस्तफा यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. सकाळच्या सुमारास शेत मालक मुस्तफा शेख त्यांच्या घरी आले असता चारही मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

मारेकऱ्यांनी घरातील एकही वस्तू नेलेली नाही. त्यामुळे बुवाबाजी किंवा अंधश्रद्धेतून ही हत्या झालाचा संशय व्यक्त होतोय. पोलिस या हत्याकांडाचा कसून तपास करतायेत. 

जळगावातल्या हत्याकांडानं सारा महाराष्ट्र हादरलाय. या चिमुकल्यांचं कुणासोबत काय वैर असेल? त्यांच्या गळ्यावर कुऱ्डाढ चालवणाऱ्यांना स्वत:ची मुलंही दिसली नसतील का? ही हत्या अंधश्रद्धेतून झाली असेल तर आपण पुरोगामीत्वाचा डंका पिटावा का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतायेत..


संबंधित बातम्या

Saam TV Live