जालन्यात गव्हाड परिवाराने स्वखर्चातून सुरू केले ५० बेडचे कोविड सेंटर

CC.jpg
CC.jpg

जालना : दिवसेंदिवस कोरोना Corona महामारीचा उद्रेक वाढत आहे जालना Jalna जिल्ह्यात देखील सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांच्या उपचारासाठी बेड्सची Beds संख्या कमी पडत आहे. In Jalna Gawhad Family Started a 50 Bed Covid Center at their Own Expense

याच पार्श्वभूमीवर जाफराबाद Jafrabad तालुक्यातील गव्हाड परिवाराच्या वतीने ग्रामीण भागात असलेल्या वरुड बुद्रुक या गावात स्वखर्चाने कोविड सेंटर Covid Center सुरु करण्यात आले आहे. नव्याने सुरु करण्यात आलेल्या या कोविड सेंटरमध्ये  ५० कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार करण्याची क्षमता उपलब्ध आहे. 

हे देखील पहा -

एकीकडे बेड्स मिळत नसल्या कारणाने ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना जिल्हाच्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करताना करावी लागणारी परवड आत्ता या कोविड सेंटर मुळे थांबणार आहे. या कोविड सेंटर मुळे जालना परिसरातील ५० रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. In Jalna Gawhad Family Started a 50 Bed Covid Center at their Own Expense

उपचारासाठी लागणाऱ्या  सर्व साहित्य व औषधांचा खर्च आणि रुग्णांना मोफत जेवणाची व्यवस्था गव्हाड परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. ग्रामीण भागात निर्माण झालेल्या या  कोविड सेंटर चे उदघाटन उप-जिल्हाअधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढत असताना गव्हाड कुटुंबीयांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक जणांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सामाजिक जबाबदारी म्हणून सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटर च्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. In Jalna Gawhad Family Started a 50 Bed Covid Center at their Own Expense

Edited By : Krushna Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com