सोलापुरात २ वर्षांपासून बंधक असलेल्या ऊस तोड मजुरांची जालना पोलिसांकडून सुटका

लक्ष्मण सोळुंके
शनिवार, 22 मे 2021

२ वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ९ जणांची जालन्यातील कदीम जालना पोलिसांनी अखेर सुटका केली आहे.गेल्या २ वर्षांपासून या नऊ जणांना सोलापूर जिल्ह्यातील बाधलेवाडी या ठिकाणी ऊस तोड मुकादमासह त्याच्या सासऱ्याने बंधक करून ठेवलं होतं.अखेर जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पुढाकाराने आणि पोलिसांच्या मदतीने बंधक असलेल्या ९ जणांची सुटका करण्यात आली आहे.

जालना -  २ वर्षांपूर्वी सोलापूर Solapur जिल्ह्यात ऊस sugarcane तोडणीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ९ जणांची जालन्यातील Jalna कदीम जालना पोलिसांनी Police अखेर सुटका केली आहे.गेल्या २ वर्षांपासून या नऊ जणांना सोलापूर जिल्ह्यातील बाधलेवाडी Badhalewadi या ठिकाणी ऊस तोड मुकादमासह त्याच्या सासऱ्याने बंधक करून ठेवलं होतं. Jalna police releases sugarcane workers from Solapur

अखेर जालन्याचे काँग्रेस Congress आमदार MLA कैलास गोरंट्याल kailash gorantyal यांच्या पुढाकाराने आणि पोलिसांच्या मदतीने बंधक असलेल्या ९ जणांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी ऊस तोड मुकादम भरत आलदार आणि दिगंबर माने Digamber Mane या बंधक बनवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

मारीया घुले,त्यांच्या आई आणि मुलगी यांनी दवाखान्यात जायचं निमित्त करून जालना गाठलं आणि आमदार  कैलास गोरंट्याल  यांना पूर्ण हकिकत सांगितली.त्यानंतर त्यांनी या महिलेला कदीम जालना पोलिसांकडे पाठवलं. Jalna police releases sugarcane workers from Solapur

या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन पोलिसांनी तातडीनं एक पथक सोलापूरकडे रवाना करून मारीया यांच्या कुटुंबातील सर्वांची सुटका केली.दरम्यान या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live