अँडरसननं 'सर' केला कुकचा विक्रम; सचिनचा विश्वविक्रम तोडण्याची संधी

james anderson
james anderson

इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना गुरुवारी बर्मिंघममध्ये सुरू झाला. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा होताच इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला. तो आपल्या संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. त्याने माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या (Alastair Cook) विक्रमाला मागे टाकले.(James Anderson set a new record by beating Cook)

आज बर्मिंघममध्ये दुसर्‍या कसोटी सामन्याच्या सुरूवातीला अँडरसन आपल्या संघाचा सर्वात जास्त कसोटी सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा अँडरसनचा 162 कसोटी सामना आहे. यापूर्वी कोणत्याही खेळाडूने हा टप्पा गाठलेला नाही.

हे दखील पाहा

 अ‍ॅलिस्टर कुकचा विक्रम तोडला

यापूर्वी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम हा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या नावावर होता. भारत विरुद्ध 2018 मध्ये निवृत्त झालेल्या कुकने एकूण 161 कसोटी सामने खेळले होते. अँडरसनचा सहकारी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड या यादीत तिसर्‍या स्थानावर आहे, आजचा त्याचा 148 वा सामना आहे. यानंतर 133 कसोटी सामने खेळणार्‍या इलेक स्टुअर्टचे नाव आहे.

भारतीय दिग्गजाच्या नावावर विश्वविक्रम 
भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 168 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम माजी कर्णधार स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग यांच्या नावावर आहे. माजी अष्टपैलू जॅक कॅलिस दक्षिण आफ्रिकेकडून 166 कसोटी सामने खेळला आहे. शिवनारायण चंद्रपॉलने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 164 कसोटी सामने खेळले आहेत.

Etited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com