सांगली महापालिका क्षेत्रात बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू

विजय पाटील
सोमवार, 3 मे 2021

सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात वाढत असणाऱ्या रुग्णसंख्येवर नियंत्रण यावे यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला.

सांगली : सांगली मिरज कुपवाड Sangli Miraj Kupwad महापालिका क्षेत्रात बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू Jatana Curfew जाहीर करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात वाढत असणाऱ्या रुग्णसंख्येवर नियंत्रण यावे यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. Janata Curfew in Sangli from Wednesday

बुधवार ता. ५ मे पासून ११ मे पर्यंत मनपाक्षेत्रात कडक जनता कर्फ्यु पाळला जाणार आहे. बैठकीनंतर याबाबतची घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली. या जनता कर्फ्यूमधून वैद्यकीय सेवा, मेडिकल Medical आणि दूध Milk व्यवसाय वगळण्यात आला असून अन्य सर्व आस्थापना आणि व्यवसाय हे सात दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णयही महापालिकेतील बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.

साताऱ्यात कडक लाॅकडाऊन
सातारा Satara जिल्हयात आज रात्री पासुन कडक लाॅकडाऊन लावण्यात येत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने हा महत्व पुर्ण निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून लाॅकडाउनची नवीन नियमावली जाहीर होणार असल्याचे सातारा जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live