sangli police karavi
sangli police karavi

जत शहरात जनता कर्फ्यु सुरु, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिला लाठीचा प्रसाद

सांगली - सांगलीच्या Sangli जत Jath तालुक्यात आज पासून जनता कर्फ्यू  janta curfew लावण्यात आला आहे. त्यामुळे जत शहरात विनाकारण आणि मोकाट फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट Antigen Test केली जात आहे. तर शहरात मोकाट फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद पोलिसांनी Police दिला जात आहे. तर सांगली मध्ये उद्या पासून जनता कर्फ्यू  असल्याने सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकनांवर कारवाईला Action सुरवात केली आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर  कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गोडम यांनी दिला आहे. janta curfew begins in Jath city

जत मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे नगरपालिका आणि सर्व पक्षीय बैठकीत आज पासून 10 दिवस जनता कर्फ्यू  घोषित केले आहे. तर आज जत शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर  अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. तर मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना लाठीचा प्रसाद पोलिसांकडून  देण्यात येत आहे.

हे देखील पहा -

सांगली Sangli महापालिका मध्ये कोरोनाचा उद्रेक पाहता जनता कर्फ्यु घोषित केले आहे. त्याच बरोबर पालकमंत्री जयंत पाटील यांनी उद्या पासून संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. कडक निर्बध पाळण्याचे आवाहन पोलीस करीत आहेत. तर सायंकाळी पासून प्रत्येक चौकात स्वतः पोलीस अधीक्षक रस्त्यावर येऊन कारवाई करणार आहेत. janta curfew begins in Jath city

दरम्यान, सांगली मिरज कुपवाड Sangli Miraj Kupwad महापालिका क्षेत्रात बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू Jatana Curfew जाहीर करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात वाढत असणाऱ्या रुग्णसंख्येवर नियंत्रण यावे यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. बुधवार ता. ५ मे पासून ११ मे पर्यंत मनपाक्षेत्रात कडक जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. बैठकीनंतर याबाबतची घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com