बुलेट ट्रेन दरवाजा बंद न करता धावली

 बुलेट ट्रेन दरवाजा बंद न करता धावली

टोकियो : सर्वांत वेगवान म्हणून बुलेट ट्रेन जगभरात प्रसिद्ध आहे. या ट्रेनचा स्पीडही नावाप्रमाणेच 'बुलेट' आहे. मात्र, ही ट्रेन धावली चक्क दरवाजा बंद न करता. यातील विशेष बाब म्हणजे या ट्रेनमध्ये 340 प्रवासीही होते.

'शिंकान्सेन' ही बुलेट ट्रेन जपानमधील शेंदई स्टेशन सोडल्यानंतर भोगद्याजवळ जेव्हा आली तेव्हा इर्मजन्सी लाईट लागली होती. त्यावरून 9 व्या डब्याचा दरवाजा उघडा आहे, असे लक्षात आले. या ट्रेनमध्ये 340 प्रवासी होते, अशी माहिती संबंधित रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. 

दरम्यान, या घटनेनंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्याने माफी मागितली असून, यापुढे अशी चूक होणार नाही, याची काळजी घेऊ, असे सांगितले. 

वेळेवर पोहचण्यासाठी ट्रेन प्रसिद्ध

जगभरात ही बुलेट ट्रेन सुरक्षित आणि वेळेवर पोहचण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, याच ट्रेनमध्ये हा प्रकार घडल्याने प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Japan bullet train runs with door open at 280 kph with 340 passengers on boar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com