रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी 'जावा' रस्त्यावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 डिसेंबर 2018

दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा  ही जगप्रसिद्ध बाईकचे भारतात पुनरागमन झाले आहे. 'रेट्रो' किंवा 'क्लासिक' प्रकारातील दुचाकी पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी ओळखल्या 'क्लासिक लिजेंड'ने जावाच्या बाईक्सचे 'रिलॉन्च' केले आहे. क्लासिक लिजेंड ही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची उपकंपनी आहे. आज बाणेर, पुणे येथे भारतातील पहिली डिलरशिप शाखा सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे, रॉयल एन्फिल्डला स्पर्धक समजल्या जाणाऱ्या जावाचे शोअरूम आणि रॉयल एन्फिल्डचे शोअरूम एकाच मजल्यावर शेजारीशेजारी आहे.

दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा  ही जगप्रसिद्ध बाईकचे भारतात पुनरागमन झाले आहे. 'रेट्रो' किंवा 'क्लासिक' प्रकारातील दुचाकी पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी ओळखल्या 'क्लासिक लिजेंड'ने जावाच्या बाईक्सचे 'रिलॉन्च' केले आहे. क्लासिक लिजेंड ही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची उपकंपनी आहे. आज बाणेर, पुणे येथे भारतातील पहिली डिलरशिप शाखा सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे, रॉयल एन्फिल्डला स्पर्धक समजल्या जाणाऱ्या जावाचे शोअरूम आणि रॉयल एन्फिल्डचे शोअरूम एकाच मजल्यावर शेजारीशेजारी आहे. 1974 पर्यंत जावा बरोबर भारतातील भागीदार असलेल्या ईराणी ब्रदर्सचे आणि सध्याचे रुस्तोमजी कंपनीचे बोमन ईराणी यावेळी उपस्थित होते. क्लासिक प्रकारातील 'आयकॉनिक' जावा पाहण्यासाठी ग्राहकांनी विशेषतः तरुणांनी गर्दी केली होती.

अशा आहेत जावाच्या दुचाकी 

जावा 300: 
जावा 300 ही स्टायलिश आणि आयकॉनिक बाईक फोर स्ट्रोक इंजिन असलेली वॉटर कूल सिस्टीम घेऊन येत आहे. ब्लॅक आणि ग्रे या डॉन कलर्समध्ये ही सादर करण्यात आली आहे.बाईकला २९३ सीसीचे इंजिन असून २७ बीएचपी आणि २८ एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. बीएस ६ च्या मानांकनावर ही बाईक आधारित आहे. बाइकची किंमत १ लाख ६५ हजार रुपये (एक्स. शोअरूम, पुणे) आहे. 

जावा 42: 'स्पोर्टी विंटेज लूक' मधील दणकट जावा 42ही ग्लॉसी मेटॅलिक रेड, ग्लॉसी डार्क ब्लू, मॅट मॉस ग्रीन, मॅट पेस्टल ब्लू, मॅट पेस्टल लाइट ग्रीन आणि मॅट ब्लू या सहा कलर्स मध्ये उपलब्ध आहे. 

न्यू जावा इंजिन : 293 सीसी लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर डीओएचसी इंजिन डबल क्रॅडल चॅसिसची जोड मिळाली आहे 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live