दादा... तुमचं स्वप्नं कस पूर्ण करणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

बुलडाणा : लोणार तालुक्‍यातील गोवर्धन नगर तांडा हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. गावाची लोकसंख्या अवघी 800 असून, गावातील तब्बल 30 जवान सैन्य दलात कार्यरत आहे. गावातील अधिकाधिक तरुण सैन्य दलात सहभागी होण्यासाठी नितीन राठोड गावात आल्यावर तरुणांना मार्गदर्शन करत होते. त्यांच्या जाण्यामुळे आता येथील तरुणांना "दादा...तुमचं स्वप्नं आता कस पूर्ण करणार?' असा हळवा सुरू काढत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 

जम्मू व कश्‍मीर राज्यातील पुलवामा येथे गुरुवार (ता. 14) दहशतवाद्यांनी "सीआरपीएफ'च्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात गोवर्धन नगर तांडा येथील जवान नितीन शिवाजी राठोड (वय 37) हुतात्मा झाले. ते 2006 मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तीन बटालियनमध्ये आसाममध्ये भरती झाले होते. 50 दिवसांची सुटी संपवून ते सोमवारी (ता. 11) आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. 

ती पोस्ट ठरली अंतिम 
जम्मू-काश्‍मीर महामार्गवरून जात असताना त्यांनी सोशल मीडियावर "सीआरपीएफ'च्या ताफ्यासोबत एक छायाचित्र अपलोड केले होते. ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्याबाबत गावातील विठ्ठल चव्हाण यांनी "सकाळ'शी बोलताना त्यांचे ते छायाचित्र अखेरची आठवण असल्याचे सांगितले. 

विमान प्रवासापूर्वी भावाशी बोलणे 
नितीन राठोड यांनी त्यांचे खामगाव येथे राहत असलेले भाऊ प्रवीण राठोड यांच्यासोबत संवाद साधत दिल्ली येथून जम्मूपर्यंतचा प्रवास विमानाने करत असल्याचे सांगितले होते. प्रवीण राठोड हेही लष्करात होते. 

अखेरची भेट 
स्वभावाने मनमिळावू असलेले नितीन राठोड हे सर्व गावकऱ्यांना आपल्याच कुटुंबातील असल्याचे वाटायचे. सुटीनंतर पुन्हा कर्तव्यावर परत असताना गावातील लहानथोरांना ते आवर्जून भेटले. परंतु ती भेट अखेरची ठरली. 

सैनिक होण्याची आवड 
नितीन राठोड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आश्रमशाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी दुसरबीड येथे पूर्ण केले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीन यांना लहानपणापासूनच सैनिकी सेवेची आवड होती. 

चिमुकल्याचा आधार हरवला 
संजय राठोड यांच्यामागे पत्नी वंदना राठोड (वय 30), मुलगा जीवन (वय 10) व मुलगी जीविका (वय 5), आई सावित्रीबाई, वडील शिवाजी रामू राठोड, दोन बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने दोन चिमुकल्यांचा आधार हरवला आहे.

Web Title: jawan Nitin Rathod martyred in Pulwama terror attack Kashmir

संबंधित बातम्या

Saam TV Live