जयंत पाटील म्हणाले, 'मला मुख्यमंत्री व्हावसं वाटतं!' जयंत पाटील असं नेमकं का म्हणाले?

साम टीव्ही
गुरुवार, 21 जानेवारी 2021

त्यानंतर पवारसाहेब जो निर्णय देतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल असंही पाटील म्हणालेत. जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. तर जयंत पाटलांच्या या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला अजित पवारांनीही पाठिंबा दिलाय. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतं. असा गौप्यस्फोट केलाय. त्याचबरोबर मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जास्त भावत असंही जयंत पाटलांनी म्हंटलंय. इस्लामपूर मध्ये एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटू शकतं. मलाही तसं वाटणं स्वाभाविक आहे. असंही जयंत पाटील म्हणालेत. इस्लामपूरमध्ये यूट्यूब चॅनलच्या मुलाखतीत हे वक्तव्य त्यांनी केलंय. जयंत पाटलांच्या या इच्छेला अजित पवारांचा पाठिंबा असल्याचं कळतंय.

पाहा व्हिडिओ -

मात्र  आमच्या पक्षाकडे सध्या हे पद नाही. प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यानंतर पवारसाहेब जो निर्णय देतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल असंही पाटील म्हणालेत. जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. तर जयंत पाटलांच्या या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला अजित पवारांनीही पाठिंबा दिलाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live