....म्हणून मी मास्क काढला- जयंत पाटलांचे पंढरपूरमध्ये वक्तव्य

भारत नागणे
रविवार, 4 एप्रिल 2021

तुम्हा कार्यकर्त्यांच्या चेहेऱ्याकडे पाहून वाटते की जगात कोरोना नाहीच. त्यामुळेच मी माझाही मास्क काढून ठेवला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपूरमध्ये केले. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 

पंढरपूर :  तुम्हा कार्यकर्त्यांच्या चेहेऱ्याकडे पाहून वाटते की जगात कोरोना नाहीच. त्यामुळेच मी माझाही मास्क काढून ठेवला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपूरमध्ये केले. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. Jayant Patil Say There is no Corona in World

देशात आणि राज्यात कोरोनाचा (Corona) विस्फोट झालेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार लाॅकडाऊन  करण्याच्या विचारात असतानाच जगात कोरोनाच नाही, त्यामुळे मी ही आता मास्क न घालता तो काढून ठेवला आहे, असे जयंत पाटील म्हणाल्याने अनेकांना धक्का बसला

राझणी येथे राष्ट्रवादीचे(NCP) प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडली. मंत्र्यांच्या सभेत  सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचे ही दिसून आले आहे. यावर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. Jayant Patil Say There is no Corona in World

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या (Bhagirath Bhalke) प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्य सरकारचे मंत्री कोरोना बाबत किती गंभीर आहेत हे या निमित्ताने समोर दिसून आले आहे. पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीचा प्रचार सुरू आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक,सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. ही बंदी झुगारून  सध्या पंढरपुरात प्रचार सभा सुरू आहेत. 

Editing By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live