'मलाही व्हायचंय मुख्यमंत्री' या वक्तव्यानं रंगलेलं राजकारण आणि त्यावरील नेत्यांच्या प्रतिक्रिया! वाचा सविस्तर

साम टीव्ही
शुक्रवार, 22 जानेवारी 2021
  • 'मलाही व्हायचंय मुख्यमत्री'
  • जयंत पाटलांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
  • अजितदादांनीही दिला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. नेमकं हे वक्तव्य काय होतं, आणि त्यावर नेमकी काय चर्चा सुरू आहे.

पाहा या संपूर्ण प्रकरणावरचा हा स्पेशल रिपोर्ट -

एरव्ही तोलून मापून बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटलांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. 'आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय' अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा उघड केलीय. इस्लामपूरमध्ये एका यु ट्यूब चॅनेलच्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीतूनच विविध प्रतिक्रिया व्यक्त होतायत. 
 

हेही वाचा - 

रोहित पवारांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर, वाढीव वीजबिल आणि औरंगाबाद नामांतरणावरून दिली ही प्रतिक्रिया

दरम्यान आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा खुलासा जयंत पाटलांनी केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची सध्याची संख्या पाहता तूर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळणं अशक्य आहे. मात्र भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरल्यास पक्षश्रेष्ठी जयंत पाटलांना मुख्यमंत्रीपद देणार का? हा खरा प्रश्न आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live