लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना "जयंत थाळी"चा आधार...

विजय पाटील
मंगळवार, 8 जून 2021

लॉकडाऊनमुळे अनेक बेघरांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या बेघरांना सांगली मध्ये "जयंत थाळी"आधार ठरली आहे. महापालिका क्षेत्रासह आसपास गेल्या एक महिन्यापासून भुकेलेल्यांसाठी मोफत जेवण पुरवण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. दररोज हजार ते बाराशे थाळ्या गोर गरिबांना दिल्या जात आहेत. तर मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कार्यालयात भेट देऊन जयंत थाळीची चौकशी केली.

सांगली - लॉकडाऊनमुळे Lockdown अनेक बेघरांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या बेघरांना सांगली Sangli मध्ये "जयंत थाळी" Jayant Thaliआधार ठरली आहे. महापालिका क्षेत्रासह आसपास गेल्या एक महिन्यापासून भुकेलेल्यांसाठी मोफत जेवण पुरवण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. दररोज हजार ते बाराशे थाळ्या गोर गरिबांना दिल्या जात आहेत. तर मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी राष्ट्रवादी NCP कार्यालयात भेट देऊन जयंत थाळीची चौकशी केली. Jayant Thali for poor in lockdown 

सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊन काळात भिकारी व बेघरांच्या जेवणाचा बिकट प्रश्न निर्माण झाला.लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद व रस्त्यावर कोणी नसल्याने बेघरांच्या जेवणाचे हाल होत असताना,अश्या बेघर आणि गरजूंसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून माणुसकीचा हात देण्यात आला आहे.

PSL च्या सुरवातीपूर्वीच खेळाडू गंभीर जखमी; पाहा VIDEO

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाने दिली जाणारी "जयंत थाळी" भुकेलेल्यांसाठी आधार देणारी ठरत आहे. युवक शहर अध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक महिन्यापासून जयंत थाळीच्या माध्यमातून मोफत जेवण देण्यात येत आहे. 300 थाळ्या पासून सुरवात झाली होती. आता ती हजाराच्या वर गेली आहे. विशेष म्हणजे हे जेवण बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे रूपांतर स्वयंपाक घरात करण्यात आले आहे. Jayant Thali for poor in lockdown 

हे देखील पहा - 

सांगली,मिरज आणि आसपास युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या एक महिन्यात 50 हजारहून अधिक जयंत थाळी पॅकेट वाटप करण्यात आले आहेत. त्याच बरोबर सांगली,मिरज येथील शासकीय रुग्णालय, शहरातील कोविड सेंटर येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हे मोफत आणि पौष्टिक भोजन वाटप करण्याचा उपक्रम अहोरात्र सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live