आता शिक्षकांनी जीन्स घालण्यावर बंधन, वाचा काय आहे नवीन नियम?

साम टीव्ही .
रविवार, 31 जानेवारी 2021

जीन्स परिधान करुन शाळेत आलेल्या विक्रमगढ येथील पाच शिक्षकांना गचविकास अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.

पालघर : जीन्स परिधान करुन शाळेत आलेल्या विक्रमगढ येथील पाच शिक्षकांना गचविकास अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे गणवेष कसा असावा याचे स्पष्ट नियम आहेत. त्यात जीन्स परिधान करण्यास मनाई आहे. हे तुम्हाला माहिती नाही काय? अशी विचारणा या शिक्षकांना करण्यात आली आहे .  

नोटीस मिळाल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. आता हा विषय किती ताणला जातो. यामध्ये प्रशासन माघार घेते की शिक्षक हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.  हल्ली अनेकांच्या पेहेरावात जीन्सचा समावेष आहे. जिकडे नजर फिरवाल तिकडे, जीथे जाल तीथे अन्‌ शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गेला तर तीथे जीन्स पॅन्ट अगदी सामान्य बाब बनली आहे. फक्त युवकांतच नव्हे तर सोयीची व टिकाऊ म्हणून सगळेच लोक जीन्सला पसंती देतांना दिसतात. मात्र ही जीन्स शासकीय नियमांत समाविष्ट नाही. शासकीय नियमानुसार सुचविलेल्या पेहेरावात जीन्स वर्ज्य आहे. त्यामुळेच विक्रमगढ येथील पाच शिक्षकांना जीन्स घातली म्हणून चक्क नोटीस बजावण्यात आली आहे. यावर तुमचा विश्‍वास बसेल काय?. मात्र तसे घडले आहे. 

होय, पोषाखावरून म्हणजेच जिन्सची चड्डी घातली म्हणून पाच प्राथमिक शिक्षकांना पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्‍याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. शाळेत नियमित ड्युटीवर असताना त्यांनी जिन्स पॅन्ट घातली हा या शिक्षकांचा दोष. त्यामुळे मुली, महिलांनी कोणते कपडे घालावेत याची वरचेवर चर्चा व त्या चर्चेवर टिका एैकायला मिळते. मात्र आता नागरिकांनी, शिक्षकांनी विशेषतः शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील हेही आता सरकारी प्रशासन ठरवायला लागले आहे. त्यामुळे काळ मोठा कठीण आला आहे, असे म्हणता येईल. यापूर्वी काही घठकांकडून अनेक वर्षांपासून महिलांवर सांस्कृतिक सेन्सॉरशिप लादण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्याला स्वतंत्र विचाराच्या महिलांनी दाद दिली नाही. आता त्यात राजकीय सत्ता सेन्सॉरशिप लादत आहे. त्यात भर पडत जाणार काय?. यातुन कार्यालयात किंवा शाळेत काय पदार्थ खावेत असाही फतवा भविष्यात निघाल्यास आश्‍चर्य वाटू नये अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. 

यासंदर्भात विक्रमगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधीत शिक्षकांना नोटीस बजावली आहे. यामध्ये कार्यालयीन वेळेत नियमानुसार पोषाख परिधान न केल्याबाबत खुलासा करण्याची सुचना केली आहे. याविषयी शिक्षणाधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दैनंदिन पेहराव हा शासकीय कर्मचाऱ्यास शोभनीय असावा. याबाबत वरील परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यातील अ, ब, क. ड, इ, ई नुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा पोषाख कसा असावा हे सविस्तर नमुद केले आहे. त्यात जीन्स पॅन्ट परिधान न करण्याबाबत स्वयंस्पष्ट सुचना आहेत. तरी सुध्दा तुम्ही शालेय वेळेमध्ये जीन्स पॅन्ट पिरधान करुन आले. शासकीय दृष्ट्या ही बाब नियमबाह्य आहे. त्याचे प्रायोजन काय? याचा लेखी खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live