बारामती: खंडेरायाचे, मयुरेश्वराचे मंदिर आजपासून ७ दिवसांसाठी बंद 

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३ एप्रिल  ते ९ एप्रिलपर्यंत खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. 

बारामती : कोरोनाच्या निर्बंधांमुळे ३ एप्रिल ते ९ एप्रिल पर्यंत खंडोबा मंदिर बंद राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी (Jejuri) येथील खंडेरायाचे  मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३ एप्रिल  ते ९ एप्रिलपर्यंत खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

मात्र या काळात खंडोबाची त्रिकाळ पूजा आणि इतर विधी मात्र सुरू राहणार आहेत. कोरोनाची (Corona) वाढत असलेली संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मोरगाव येथील मयुरेश्वराचे मंदिर आजपासून ७ दिवसांसाठी बंद 

अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेले मयुरेश्वराचे  मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. ३ एप्रिल ते ९ एप्रिल पर्यंत मयुरेश्वराचे मंदिर राहणार बंद ठेवणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३ एप्रिल  ते ९ एप्रिलपर्यंत मयुरेश्वराचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय  प्रशासनाने घेतला आहे. मात्र या काळात  पूजा आणि इतर विधी मात्र सुरू राहणार आहेत. कोरोना बांधितांची वाढती संख्या पाहता हा निर्णय प्रशासनामार्फत घेण्यात आला आहे.

भीमाशंकर मंदिर रहाणार बंद भाविकांच्या दर्शनासाठी बंद.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर आजपासुन पुढील सात दिवस मंदिर दर्शनासाठी रहाणार बंद रहाणार आहे.
मात्र नेहमीच्या परंपरेनुसार शिवलिंगावरील आरती पुजा पाठ पुजा-यांच्या उपस्थीत होणार आहे. 

Edited By- Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live