जेसिकाच्या मारेकऱ्याला माफी द्यावी - सब्रिना लाल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 एप्रिल 2018

नवी दिल्ली - जेसिका लाल हत्या प्रकरणातील आरोपी सिद्दार्थ वशिष्ट ज्याला मनू शर्मा या नावानेही ओळखले जाते, याच्या सुटकेबाबत माझा कुठलाही आक्षेप नाही, असे जेसिकाची बहिण सब्रिना लाल हिने स्पष्ट केले आहे. सध्या तिहार कारागृहात असताना ते तिथल्या कैद्यांसाठी चांगल्या प्रकारचे काम करत आहेत जे एक सुधारणेचे प्रतिबिंब आहे असे मला वाटते असेही तिने स्पष्ट केले आहे.

सब्रिना लाल हिने कारागृह अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, सिद्धार्थ याने 15 वर्षे कारागृहात घालवलेली आहेत आणि त्याने या काळात तेथील कैद्यांसाठी खुप चांगल्या प्रकारचे काम केलेले आहे. ते एक त्याच्यातील सुधारणेचे प्रतिबिंब आहे, त्यामुऴे आता त्याच्या सुटकेबाबत कुठलाच आक्षेप असण्याचे कारण नाही.

जेसिका हत्या प्रकरणाला आता जवळपास 20 वर्षे होत आहेत, मग आणखी किती दिवस या प्रकरणामध्ये मी अडकून राहणार असा प्रश्नही तिने यावेळी केला.  

एखाद्याला क्षमा करणे हे एक मोठेपणाचे लक्षण आहे. तसेच, क्षमा करुन पुढे जाणे हे आमच्याही हिताचे ठरेल. आता त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा राग नाही. त्याचबरोबर सिद्धार्थने केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळाली आहे, असेही तिने स्पष्ट केले. 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live