भाजपकडून ५२ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने आज ५२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात मुख्यमंत्री रघुवरदास आणि प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलोआ यांच्यासह विद्यमान तीस उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे.

नवी दिल्ली - झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने आज ५२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात मुख्यमंत्री रघुवरदास आणि प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलोआ यांच्यासह विद्यमान तीस उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, राजनाथसिंह, नितीन गडकरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ५२ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ५२ जणांच्या पहिल्या यादीमध्ये पाचही टप्प्यातील उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने ३० विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली असून, दहा आमदारांना घरी बसवले आहे. मुख्यमंत्री  रघुवरदास हे जमशेदपूर (पूर्व) मधून, तर प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ हे चक्रधरपूरमधून लढतील. ५२ जणांच्या यादीत १३ तरुणांना, तर पाच महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही आज पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. निवडणूक समितीचे प्रभारी सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

Web Title: jharkhand vidhansabha election BJP 52 candidate declare politics
 


संबंधित बातम्या

Saam TV Live