VIDEO | चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले हिटलर, क्षी जीनपिंगच्या हिटलरगिरीचा व्हिडिओ पाहाच!

साम टीव्ही
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020
  • चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले हिटलर
  • कारनामे हिटलरचे, आता चेहराही
  • एक व्हिडीओ हजार चर्चा
     

चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग. सध्या सगळं जग यांच्याच नावाने बोटं मोडतंय. कोरोना काळात हाच खरा व्हिलनचा चेहरा बनलाय. अशात जिनपिंग यांची तुलना केली जातेय.. इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या खलनायकाशी. अॅडॉल्फ हिटलरशी. 

हा व्हिडिओ पाहा -

 सोशल मीडियावर या व्हिडीओ व वेगाने व्हायरल होतोय.. जगभरातले नेटिझन्स यावर व्यक्त होतायत. आजवर जिनपिंग यांच्या धोरणांवर टीका होत आली आहे. मग सीमेवरचा तणावर असो. व्यापर युद्धाची ठिणगी असो. किंवा मग कोरोना काळातली संशयित भूमिका असो. जिनपिंग यांचा चेहरा खलनायकाचाच राहिलाय. आणि त्यात व्हायरल होणारा हा व्हिडीओ. 

एकूण 1 मिनिटं 22 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. ज्याची सुरुवात होते जिनपिंग यांच्या अॅनिमेटेड फोटोपासून. ज्या फोटोवर दिसतेय जगातल्य महाखलनायकाची मिशी. 

विशेष म्हणजे या व्हिडीओत जिनपिंग म्हणतायत मला युद्ध नकोय. शांतता हवी आहे. शांततेचा एक तुकडा हवा आहे. पुढे ते कजाकिस्तान आणि पाकिस्तानवरही आपला दावा करतात. काहीच सेकंदात या व्हिडीओत भारतीय सैनिक एका दुसऱ्या सैनिकाशी लढताना दिसतो.

कपटी आणि कुरपातखोर चीनच्या नेतृत्वाची तुलना हिटलरशी होणं ही जगासाठी चिंतेची बाब आहेच आणि धोक्याची घंटाही आहे. पण खरंच जिनपिंग हिटरलच्या मार्गावर जाणार असतील, तर त्यांनी हिटरचा शेवटही  एकदा आठवायला हवाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live