जिंतूरात व्यापाऱ्यांची पोलिसांवर दादागिरी...

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

जिंतूर शहरात संचारबंदीच्या काळात किराणा दुकान चालू असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर बंद करण्याची विनंती करताच. संतप्त दुकानदाराने पोलिसांच्या हातातील लाठी हिसकावून मारण्याचा प्रयत्न

परभणी : जिंतूर Jintur शहरात संचारबंदीच्या काळात किराणा दुकान चालू असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या Police निदर्शनास आल्यानंतर बंद करण्याची विनंती करताच. संतप्त दुकानदाराने पोलिसांच्या हातातील लाठी हिसकावून मारण्याचा प्रयत्न करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची, घटना छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलना समोर घडली आहे. In Jintur, traders bully the police

कोरोनाचा Corona महामारीत आपले कर्तव्य बजावत असताना व्यापाऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या प्रकारामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातही बलसा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात ऋषिकेश प्रॉव्हिजनचे मालक प्रल्हाद टाकरस हे संचारबंदीच्या काळात आपले दुकान उघडून बिनधास्त व्यापार करत असल्याचे, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या निदर्शनास आले.

यावेळी पोलिसांनी संचारबंदीच्या Curfew काळात दुकान चालू ठेवु नये बंद करावे. अशी विनंती केली. मात्र, संतप्त झालेल्या टाकरस यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी संतप्त झालेल्या दुकानदारास समजावण्याचा प्रयत्न केले. मात्र दुकानदाराने अधिकाऱ्यासच एकेरी भाषेत बोलण्यास सुरुवात करून पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील Nagnath Patil यांचा हातातील लाठी हिसकावून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न केला. In Jintur, traders bully the police

यावेळी इतर पोलिसांनी त्यास पकडून लाठीचा चांगलाच चोप दिला आहे. बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. एकीकडे पोलिसांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानीत केल जात आहे, तर दुसरीकडे भर चौकात व्यापाऱ्याकडून पोलीस अधिकाऱ्यावर अर्वाच्च भाषा वापरून लाठी हिसकावून दहशत निर्माण करणे, हे अशोभनीय असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहेत. जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

 

संबंधित बातम्या

Saam TV Live