आता  JIO सुद्धा आता 'पैसे भर के'

आता  JIO सुद्धा आता 'पैसे भर के'

नवी दिल्ली : ‘जिओ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार कंपनीच्या ग्राहकांना अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर करण्यात येणाऱ्या कॉलसाठी काही रक्कम देणे बंधनकारक असेल, तोपर्यंत प्रति मिनिट सहा पैशांप्रमाणे ग्राहकांकडून शुल्कवसुली करण्यात येणार आहे. मात्र, हे शुल्क ‘जिओ’च्या ग्राहकांनी अन्य ‘जिओ’ यूजरच्या क्रमांकावर केलेले कॉल, व्हॉट्सअॅप, फेसटाइम आदी प्लॅटफॉर्मचा उपयोग करून करण्यात येणारे फोन आणि लँडलाइन कॉल्स आदींवर लागू होणार नसल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे. मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी (२०१७) दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने ‘इंटरकनेक्ट यूसेज चार्ज’ प्रति मिनिट १४ पैशांवरून घटवून सहा पैशांवर आणण्यात आले. त्या वेळी हे शुल्क जानेवारी २०२०पासून रद्द करण्याचीही घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता ‘ट्राय’ने या संदर्भात शुल्क रद्द करण्यासाठी आणखी वेळ देण्याची आवश्यकता आहे का या विषयावर शिफारस मागवली आहे.  ‘ट्राय’च्या या भूमिकेमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ‘जिओ’ने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या नेटवर्कवर करण्यात आलेल्या कॉलसाठी प्रति मिनिट सहा पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथमच जिओच्या ग्राहकांकडून व्हॉइस कॉलसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्या ‘जिओ’तर्फे केवळ डेटासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारण्यात येते. कंपनीतर्फे देशभर कोठेही आणि कोणत्याही नेटवर्कवर व्हॉइस कॉलची सुविधा पूर्णपणे मोफत आहे. सध्या ‘जिओ’च्या नेटवर्कवर अन्य स्पर्धक कंपन्यांकडून येणारे इनकमिंग कॉल मोफत आहेत. ‘जिओ’च्या नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग मोफत आहे. मात्र, त्यामुळे कंपनीला भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया आदी अन्य ऑपरेटर्सना करण्यात आलेल्या कॉल्ससाठी १३,५०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

 
Web Title jio to charge users 6 paise

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com