जितिन प्रसाद : काँग्रेसला सोडण्याची ३ कारणे आणि ब्राह्मण समीकरण?

jatin prasad.jpg
jatin prasad.jpg

राहुल गांधी Rahul Gandhi  यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद Jatin Prasad  यांनी काँग्रेसला Congress  सोडचिठ्ठी देत भाजपात BJP  प्रवेश केला. २०२२  मधील विधानसभा निवडणुकीच्या Assembly elections पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा हादरा मानला जातोय. जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम का केला याचा खुलासा त्यांनी मुलाखतीत केला आहे.   (Jitin Prasad: 3 reasons to leave Congress and Brahmin equation?) 

काय म्हणाले जितिन प्रसाद?  
> मोदींचे सक्षम नेतृत्व 

मी गेल्या तीन पिढ्यांपासून काँग्रेससोबत होतो. माझे वडील जितेंद्र प्रसाद यांनाही काँग्रेसचा मोठा चेहरा मानले जात असे. जितेंद्र प्रसाद हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय होते. मात्र काँग्रेस सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. आता माझ्या राजकीय जीवनाचा नवा अध्याय सुरू होत आहे. बराच  विचारविनिमय केल्यानंतर मी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे जितिन प्रसाद यांनी म्हटले आहे. देशभरात कोरोनासह अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटांवर मात करण्यासाठी भाजपा व नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे देशहितासाठी सर्वात सक्षम आहे, असे मत  भाजपात सामील झाल्यानंतर जितिन प्रसाद यांनी मांडले आहे.  

> काँग्रेसमध्ये आपल्याच लोकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही 
मी ज्या पार्टीत होतो त्या पार्टीत असताना मला समजले की याठिकाणी आपल्याच लोकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे  अशा ठिकाणी कार्य करणे योग्य नाही जिथे स्वतःच्याच लोकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. मग आपण आपल्याच पक्षाच्या कामी येत नसलो तर अशा ठिकाणी काम करणे योग्य नाही, असे जितिन प्रसाद यांनी सांगितले. खरं तर, काँग्रेस नेतृत्वावर जितिन प्रसाद गेल्या काही काळापासून नाराज होते. सोनिया गांधी यांना गेल्या वर्षी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पत्र लिहिले होते. ज्या नेत्यानी त्यांना पत्र लिहिले होते त्यांपैकी जतीन प्रसाद हे एक होते. 

> काँग्रेस दिशाहीन आणि जनतेपासून दूर गेलाय 
काँग्रेस पक्ष दिशाहीन आणि जनतेपासून दूर गेला आहे. मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घाईघाईने घेतला नाही, असे जितिन प्रसाद यांनी सांगितले. काँग्रेस लोकांपासून दूर गेला आहे. मी काँग्रेसमधील दरी भरून काढण्याचा आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा काहीही झाले नाही आणि माझे म्हणणेही कोणी ऐकले नाही. तेव्हा मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, असे जितिन प्रसाद म्हणाले.

- जितिन प्रसाद यांच्या पक्षांतराबाबत काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी जितिन प्रसाद यांच्या काँग्रेस सोडण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जे गेले त्यांना आपण थांबवू शकत नाही. हा  जितिन यांचा निर्णय होता. काँग्रेसमध्ये त्यांना उज्ज्वल भविष्य होते. मात्र त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय हा दुर्दैवी होता, असे खरगे यांनी सांगितले.  

तर मार्च-एप्रिलच्या बंगाल निवडणुकीत जितिन प्रसाद यांच्यासोबत काम करणारे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी देखील त्यांच्या या निर्णयावर भाष्य केले आहे. जितिन एक चांगला माणूस म्हणून ओळखले जात होते. आमच्या पक्षासाठी तो प्रमुख ब्राह्मण चेहरा होता. त्यांनी लोभापायी भाजपात प्रवेश केला असावा, असे चौधरी म्हणाले.

तर कपिल सिब्बल म्हणाले, जितिन प्रसाद यांनी जे केलं त्याच्याविरोधात मी नाही. त्यामागे काहीतरी कारण असेल जे त्यांनी सांगितलेलं नाही. पण जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश करणे हे मला समजलं नाही. यातून हेच दिसतं की आया राम गया राम संस्कृतीचा प्रवास आता प्रसाद पॉलिटिक्सकडे वळला आहे. जिथे प्रसाद मिळतो त्या पक्षात जातात, असा टोला त्यांनी लगावला.

- जितिन प्रसाद आणि ब्राह्मण समीकरण
गेली दीड वर्ष जितिन प्रसाद यांनी ब्राह्मण समाजाचे नेते अशी ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेतली. काँग्रेसचे तरुण नेते अशी त्यांची पूर्वीची ओळख होती. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण चेतना यात्रा देखील काढली. हत्या, बलात्कार या प्रकरणातील पीडित ब्राह्मण कुटुंबियांची त्यांनी भेटही घेतली होती. २०१५ मध्ये त्यांनी आर्थिक निकषावर आधारित आरक्षण या भूमिकेचं समर्थन केले होते. उत्तर प्रदेशमधील एकूण मतदारांपैकी १४ टक्के मतदार हे ब्राह्मण आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून ५० ब्राह्मण आमदार निवडून आले. पण त्यापैकी मोजक्याच आमदारांना योगी सरकारमध्ये स्थान मिळाले. सध्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाकडे दिनेश शर्मा (उपमुख्यमंत्री) आणि ब्रिजेश पाठक (मंत्री) असे दोन महत्त्वाचे ब्राह्मण समाजातून आलेले नेते आहेत. या नेत्यांमुळे ब्राह्मण मतदार भाजपाकडे वळतील का असा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर जितिन प्रसाद यांना पक्षात स्थान देऊन भाजपाने ब्राह्मण समाजाची मते पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

Edited By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com