जितिन प्रसाद : योगी  सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी?  

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जून 2021

योगी आदित्यनाथ यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर उत्तर प्रदेशमधील मंत्रिमंडळात फेरबदल होणार, अशी चर्चा असून दोन दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश करणाऱ्या जितिन प्रसाद यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर उत्तर प्रदेशमधील मंत्रिमंडळात फेरबदल होणार, अशी चर्चा असून दोन दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश करणाऱ्या जितिन प्रसाद यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. जितिन प्रसाद यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन ब्राह्मण समाजाची मते पक्षाकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. (Jitin Prasad: Ministerial lottery in Yogi government?) 

योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेतली. मोदींसह अमित शाह, जे पी नड्डा या नेत्यांशीही योगी आदित्यनाथ यांनी चर्चा केली. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जितिन प्रसाद यांना विधान परिषदेचे तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. 

मास्क संदर्भात वैज्ञानिकांचा नवा खुलासा; जाणून घ्या कोणता मास्क योग्य?

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपा ब्राह्मण चेहऱ्याच्या शोधात होती. जितिन प्रसाद यांच्यामुळे पक्षाकडे ब्राह्मण मतदार वळतील, असे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना वाटते. 

मंत्रिपदाची लॉटरी? 
सध्या लोकसभा किंवा राज्यसभेसाठी निवडणूक नाही. त्यामुळे जितिन प्रसाद यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता कमीच आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित आहे. भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ब्राह्मण चेहऱ्याच्या शोधात होती.  जितिन प्रसाद यांच्या भाजपाप्रवेशामागे हीच खेळी असल्याची चर्चा आहे. जितिन प्रसाद यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live