काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 एप्रिल 2018

19 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. या 5 वर्षांच्या शिक्षेबरोबरच, सलमान खानला दहा हजार दंडही ठोठावण्यात आलाय. सलमानला 5 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्याला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे. आज जोधपूर जेलमध्येच सलमानचा मुक्काम राहणार आहे. जोधपूर कोर्टानं हा सर्वात मोठा निकाल दिलाय. हा निकाल ऐकल्यानंतर सलमान खानला अश्रू अनावर झालेत. त्याचबरोबर त्याची दोन्ही बहिणी अर्पिता आणि अल्विरा या दोघींनाही रडू कोसळलंय. दरम्यान या निकालानंतर बिश्नोई समाजानं मोठा जल्लोष केलाय.

19 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. या 5 वर्षांच्या शिक्षेबरोबरच, सलमान खानला दहा हजार दंडही ठोठावण्यात आलाय. सलमानला 5 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्याला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे. आज जोधपूर जेलमध्येच सलमानचा मुक्काम राहणार आहे. जोधपूर कोर्टानं हा सर्वात मोठा निकाल दिलाय. हा निकाल ऐकल्यानंतर सलमान खानला अश्रू अनावर झालेत. त्याचबरोबर त्याची दोन्ही बहिणी अर्पिता आणि अल्विरा या दोघींनाही रडू कोसळलंय. दरम्यान या निकालानंतर बिश्नोई समाजानं मोठा जल्लोष केलाय. कोर्टाच्या बाहेर निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या बिश्नोई समाजानं या निकालाचं स्वागत केलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live