marvan attapatu
marvan attapatu

क्रिकेट कारकिर्दीत पहिल्या 6 वर्षात फक्त 1 धाव; नंतर बनला 'कर्णधार'

कोणत्याही क्रिकेटपटूला (Cricket) कारकिर्दीत उत्कृष्ट फलंदाज होण्यासाठी प्रत्येक वेळी स्वत:ला सिद्ध करावे लागते. मिळालेल्या संधीला शेवटची संधी समजत फलंदाज मैदानावर उतरत असतो. मिळालेल्या संधीचं सोनं करत हळू हळू खेळाडू आपल्या कारकिर्दीत चांगले फलंदाज बनत असतात. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), विराट कोहली (Virat Kohli) त्याचं एक अलीकडचे उदाहरण. काही खेळाडूंची सुरुवात अतिशय खराब होते. परंतु, त्यानंतर ते खेळाडू आपल्या देशाचे चांगले फलंदाज बनतात. रोहित शर्मा (Rohit Sharma) हे त्याचं उदाहरण, रोहितच्या कारकिर्दीतील सुरवातीचा काळ फार वाईट होता. परंतु, कर्णधार महेंद्र सिंग धोनीने (MS Dhoni) रोहितला सतत संधी देत त्याला महान फलंदाज बनवले.

रोहित सारखाच श्रीलंकेचा एक फलंदाज होऊन गेला. त्याच्या कारकिर्दीत पहिले 6 वर्ष तो सतत अपयशी ठरत होता. परंतु, काही काळानंतर त्याचं नशीब एवढं काही पलटलं की तो फलंदाज आपल्या देशासाठी सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज बनला. तो फलंदाजाचं म्हणजे श्रीलंकेचा माजी कर्णधार मार्वन अट्टापटू (Marvan Atapattu). (Just 1 run in the first 6 years of his cricket career; Later became 'captain')

श्रीलंकेचा माजी कर्णधार मार्वन अटापट्टूने 1990 मध्ये भारताविरुद्ध कसोटी सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात अटापट्टूच्या नशिबाने विश्वासघात केला आणि दोन्ही डावांमध्ये तो एकही धाव न करता बाद झाला. पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप झाल्यानंतर अटापट्टूला संघातून वगळावे लागले. अटापट्टूला 2 वर्षानंतर कारकीर्दीत दुसरी कसोटी खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या 17 डावांच्या दरम्यान, अटापट्टू 6 डावात शून्यावर बाद झाला.  

पहिल्या सहा वर्षात बनवली केवळ 1 धाव
2 वर्षानंतर 1992 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलंबो कसोटीत अटापट्टूला संधी मिळाली. परंतु, इथेही त्याच्या नशिबाने घात केला. कारकिर्दीच्या दुसर्‍या कसोटीत अटापट्टूला पहिल्या डावात 0 तर दुसऱ्या डावात 1 धाव करण्यात आले. इथे असे वाटले की अटापट्टूची कारकीर्द संपेल. परंतु, त्यांनतर अट्टापटूच्या नशिबाने यू- टर्न घेतला आणि त्याच्या कारकिर्दीत चांगले दिवस आले. यानंतर 1996 मध्ये अटापट्टूची कारकीर्द प्रख्यात झाली. 1996 मध्ये भेटलेल्या संधीचं अटापट्टूने सोनं केलं आणि त्यानंतर मागे वळून पहिले नाही.

अट्टापटूची क्रिकेट कारकीर्द
कसोटीत अटापट्टूने 90 सामन्यांमध्ये 5502 धावा केल्या ज्यामध्ये 16 शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश होता. कसोटीत त्याने सरासरी 37.52 च्या सरासरीने धावा केल्या. कसोटीत या फलंदाजाने 6 वेळा दुहेरी शतक झळकावले आहे. यानंतर अटापट्टू एकदिवसीय मालिकेतही श्रीलंकेच्या फलंदाजीचा कणा झाला. एकदिवसीय सामन्यात 268 सामने खेळत श्रीलंकेच्या या फलंदाजाने 8,529 धावा केल्या ज्यामध्ये 11 शतके आणि 59 अर्धशतकांचा समावेश आहे.  अटापट्टूने आपल्या कारकीर्दीत 2 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 5 धावा केल्या. अटापट्टूने आपला शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2007 मध्ये होबार्टमध्ये खेळला होता, तर शेवटचा वनडे 2007 मध्ये भारत विरुद्ध खेळला होता.

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com