जरा थांबा ! घरात तुम्ही वस्तू- धान्य साठवून ठेवताय .... 

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 19 मार्च 2020

करोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता तुम्हालाही आजूबाजूला वस्तूंच्या किंमती वाढलेल्या किंवा तुमचे शेजारी घरात धान्य आणि वस्तू साठा करताना दिसले असतील. पण घाबरून जाऊ नका कारण..

नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं आवाहन पासवान यांनी नागरिकांना केलं आहे. देशभर करोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेतानाच अफवांनाही पेव फुटल्याचं पाहायला मिळतंय. गर्दी टाळण्यासाठी अनेक धार्मिक स्थळं, संस्था बंद करण्यात आल्यात. अफवांमुळे नागरिकांच्या चिंतेत आणखीनच भर पडत आहे. त्याचाच परिणाम म्हणून अनेक ठिकाणच्या दुकानांमधलं धान्य संपल्याच्या किंवा किंमती वाढल्याच्या बातम्या येत आहेत. '१ एप्रिल २०२० पर्यंत सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाऱ्या धान्यात १३५.८ लाख टन तांदूळ आणि ७४.६ लाख टन गव्हाची आवश्यकता आहे. एकूण २१९.४ लाख टन धान्याची गरज आहे. अशावेळी सरकारकडे एकूण ६४६.०९ लाख टनांचा स्टॉक उपलब्ध आहे. याचाच अर्थ आपल्याकडे ४३५.६९ लाख टन अतिरिक्त स्टॉक उपलब्ध आहे' असं ट्विट केंद्रीय मंत्री पासवान यांनी केलंय.
'लॉकडाऊन'च्या स्थितीत गैरसोय नको म्हणून लोक अत्यावश्यक गोष्टी, धान्याचा साठा करू लागलेत. नागरिकांमधली हीच भीती दूर करण्यासाठी अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान समोर आलेत.

 

हेही वाचा : भयानक! आतापर्यंत 7 हजार जणांना कोरोनानं गिळलं, त्यात भारतातले 3 जण

सध्या पंजाब सरकार सहा महिने आणि ओडिसा सरकार एका वेळी दोन महिन्यांचा कोटा घेत आहेत. इतर राज्यातील सरकारही याचा फायदा घेऊ शकतील' अशी सूचनाही पासवान यांनी राज्य सरकारला केलीय.'सरकारच्या स्टॉकमध्ये २७२.९० लाख टन तांदूळ आणि १६२.७९ लाख टन गहू आहे. केंद्राच्या सर्क्युलरनुसार, राज्य सरकार एका वेळी सहा महिन्यांपर्यंत सार्वजनिक वितरण प्रणालीचं धान्य घेऊ शकतील. 'देशात धान्याची कमतरता नाही त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. याशिवाय खुल्या बाजारातीही OMSS द्वारे विक्री सुरू आहे, यामध्ये तांदळाचे दर २२.५० रुपये प्रती किलो आहे' असंही पासवान यांनी म्हटलंय.

हेही वाचा ::   VIDEO | एकदा बघाच! सॅनिटायजर लावणाऱ्या या पोलिसांचा डान्स प्रभुदेवालाही लाजवेल

 करोना संक्रमणाच्या भीतीनं या वस्तूंची मागणी वाढलीय. देशभरात ११४ ठिकाणी या वस्तूंच्या किंमतीवर नजर आहे.  सरकार सध्या साबण , डेटॉल, फरशी किंवा हात धुण्यासाठी वापरले जाणारे क्लीनर आणि थर्मल स्कॅनर यांसारख्या वस्तूंच्या किंमतीवरही सरकारचं लक्ष आहे. यामध्ये आता चेहऱ्यावर लावलं जाणारं मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर याचाही समावेश करण्यात आलाय.येत्या दिवसांत या वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार नाही, यावर सरकारची नजर राहील. 

हेही वाचा ::  गोव्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याची निव्वळ अफवा 

काही दुकानदारांनी मागणी वाढल्यानं आपल्या दुकानातील धान्य संपल्याचं आणि आपल्याकडे धान्याचा पुरवठा होत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे, दुकानदारांनीही स्टॉक करत जमाखोरी सुरु केल्याचं समोर येतंय. अत्यावश्यक वस्तूंमध्ये तांदूळ, पीठ, गहू, चनाडाळ, तूरडाळ, उडीद, मूग, मसूर या डाळी, शेंगदाना तेल, मोहरीचं तेल, सोयाबीन, सूरजमुखी तेल, पाम तेल, वनस्पती तेल, बटाटे, कांदा, टोमॅटो, साखर, गूळ, दूध, चहा आणि मीठ या वस्तूंचा अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश होते. 

 WebTittle ::  Just wait! In the house you are storing things - grain ...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live