कडकनाथ कोंबडी प्रकरणात लाखो रुपयाची फसवणूक

कडकनाथ कोंबडी प्रकरणात लाखो रुपयाची फसवणूक

चिपळूण - कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणात रत्नागिरी जिल्ह्यातील सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. पहिल्या टप्प्यात घोटाळ्यात फसवणूक झालेल्या 38 शेतकऱ्यांनी इस्लामपूर (जि. सांगली) येथील रयत ऍग्रो इंडिया कंपनी विरोधात 73 लाख 86 हजार 300 रुपयांची फसवणूक झाल्याची संयुक्त तक्रार पोलिस उपअधीक्षकांकडे दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. 

दरम्यान, घोटाळ्यात चिपळूणसह दापोली, संगमेश्‍वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचीही फसवणूक झाल्याचे उघड होत आहे. कडकनाथ कुक्‍कुटपालनाच्या विविध फायदेशीर योजना सांगून शेतकऱ्यांशी थेट करार करण्यात आले. त्यानुसार चिपळूण तालुक्‍यातील पोसरे, मालदोली व दोणवलीतील शेतकऱ्यांनी कंपनीसोबत थेट करार केले. 75 हजार, एक लाख 20 हजार, असे प्रत्येकी 200 कोंबड्यांचे युनिट होते. वैद्यकीय सल्ल्यासह खाद्य पुरवठा कंपनी करणार होती. कोंबड्या तसेच अंडीही 50, 30, 20 रुपये दराने खरेदी करणार होती.

सुरुवातीला 6-7 महिने कंपनीकडून झालेल्या करारानुसार सेवा-सुविधा देण्यात आल्या; मात्र काहींना पैसे भरूनही कोंबड्यांचा पुरवठा झाला नाही. परिणामी, दोन महिन्यांपूर्वीच त्यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झालेल्या लोकांनी उपअधीक्षक सूरज गुरव यांची भेट घेत चर्चा केली. फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 

फसवणूक झालेले असे (कंसात रक्कम) 
झीनत इनामदार (2,17,900), हिलाल इनामदार (2,17,900), दीन महंमद अब्दुल रझाक कुपे (2,17,900), आसिफ इनामदार (2,17,900), अशोक चव्हाण (4,61,900), सुभाष कदम (2,89,900), मंदार चांदीवडे (7,60,600), गणेश लाड (2,17,900), वसंत राऊत (1,31,000), दगडू राऊत (1,20,000), दिनेश महाजन (2 लाख), राजेश पटेल (1,33,000), विमला पटेल (1,33,000), शशिकांत भंडारी (1,93,000), शर्वरी भंडारी (1,93,000), दीपिका गुरसळे (1,93,000), तस्लिमा कवारे (3,01,000), सतीश कदम (1,78,000), सोनल लाड (1,78,000), अझरुद्दीन पटेल (40,000), वैभव खेडेकर (2,18,000), गणेश खेडेकर (1,58,000), विजय भोबेकर (1,58.000), रंजना भोबेकर (1,58,000), श्रीधर पवार (7,36,000), कळंबे (2,50,000), जितेंद्र करंजकर (1,44,400), शैलेश माळी (1,20,100), प्रतीक बोरीवले (1,10,100), संतोष वाघे (1,14,400), प्रकाश बोरीवले (1,14,400), सुधीर राडे (1,45,900), अक्षय तटकोरे (50,000). 

फसवणूक झालेली गावे 
चिपळूण तालुक्‍यातील पोसरे, दोणवली, मालदोली, दहिवली, केतकी, भिले, पाचाड, सावर्डे, दळवटणे. संगमेश्‍वर तालुक्‍यातील पोसरी आणि दापोली तालुक्‍यातील काही गावे.  

 
 

Web Title: Kadaknath hen fraud case Konkan follow up
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com