तुम्हाला आता  कडकनाथ कोंबडी मिळणार फक्त १०० रुपयाला

तुम्हाला आता  कडकनाथ कोंबडी मिळणार फक्त १०० रुपयाला

मुरगूड - कोल्हापूर, सांगलीत ‘कडकनाथ’चा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सध्या गाजत आहे. मुरगूडच्या आठवडी बाजारात  ‘कोणतीही कडकनाथ कोंबडी घ्या, १०० रुपयांत’ असा विक्रीचा फंडा या उद्योगात गुंतवणूक करणाऱ्या तरुणांनी वापरला. ४०० ते ५०० रुपयांना विकली जाणारी कोंबडी केवळ १०० रुपयांत मिळत आहे.

कंपनीच अस्तित्वात नसल्यामुळे कोंबड्यांना खाद्य आणायचे कुठून? आणि तो खर्च करायचा कसा? असे प्रश्‍न गुंतवणूकारांपुढे आहे. आहे त्या कोंबड्या विकून किमान कर्जाचे व्याज तरी भागवता यावे, यासाठी धडपड सुरू आहे. शिवाय कंपनीने खाद्य बंद केल्यामुळे हे पक्षी मरण्यापेक्षा नगण्य किमतीला का असेना विकून टाकावेत, यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे.

मुरगूड बसस्थानकाच्या परिसरात हा कडकनाथ कोंबडी घेऊन आलेला टेम्पो लावला होता. तिथे स्पीकरवर ‘कडकनाथ कोंबडी घ्या, १०० रुपयात’, असे पुकारण्यात येत होते.

कडकनाथ उद्योगात ७५ हजार रुपयांप्रमाणे कोंबड्यांच्या १२ बॅच घेतल्या. गारगोटी-शिंदेवाडी येथे व्यवसाय सुरू केला होता. यात सुमारे नऊ लाख, तर खाद्यासाठी दीड लाख व शेड उभारणी अशी १० ते १२ लाख गुंतवणूक केली. कंपनीने घोटाळा केल्यामुळे सध्या आर्थिक अरिष्टात सापडलो. सध्या कोंबड्यांना खाद्यही नाही. किमान मरणाऱ्या कोंबड्या वाचतील, या उद्देशाने कोंबड्या १०० ला विकण्याची वेळ आली आहे.
- अशोक शामराव देसाई, रा. वेंगरूळ, ता. भुदरगड.

Web Title: Kadaknath hen only 100 Rs.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com