डॉ.पोळच्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कळंबा कारागृह अधीक्षक शेळकेंची तडकाफडकी बदली

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

कोल्हापूर - कळंबा कारागृहातील डॉ.संतोष पोळच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी सुरु असलेल्या चौकशीतील अडथळा होत असल्याने कारागृह अधीक्षक शरद शळके यांची तडकाफडकी बदली झाली आहे.

शनिवारी रात्री उशिरा त्यांना याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. दत्ताजी शेळके यांची कारागृहाचे नवे अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी याआधी १४ कर्मचारी व एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. 

राज्यात गाजलेल्या वाई हत्याकांडातील आरोपी डॉ.संतोष पोळ हा कळंबा कारागृहात आहे.२७ नोव्हेंबरला त्याचे कारागृहातील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यामध्ये डॉ.पोळ हातात रिव्हॉल्वर घेऊन फिरत होता. त्याचबरोबर त्याने एक मुलाखत देऊन त्यामध्ये कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. हे व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती. 

कारागृह विभागाच्या पोलिस महानिरीक्षक स्वाती साठे यांनी याची गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली होती. ज्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसणारे रिव्हॉल्वर खोटे असल्याचे समोर आले. मात्र कारागृहात मोबाईल कसा गेला? याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आतापर्यंत १४ कर्मचाऱ्यांसह एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. अद्याप या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नाही.

दरम्यान या तपासात अडथळा अथवा दबाव येऊ नये यासाठी कारागृह विभागाने अधीक्षक शरद शेळके यांची बदली केली आहे. त्यांची विसापूर येथील खुल्या कारागृहात बदली झाली आहे. कळंबा येथील पदभार तत्काळ सोडून विसापूर येथे हजर होण्याचे आदेश त्यांना प्राप्त झाले आहेत.

अनेकांना धक्का
शरद शेळके यांनी तीन वर्षापूर्वी कळंबा कारागृहाच्या अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. या काळात त्यांनी कैद्यांसाठी विविध उपक्रम राबवले होते. येत्या काही दिवसात त्यांना पदोन्नती ही मिळणार होती. मात्र त्याअधीच त्यांच्या झालेल्या बदलीमुळे त्यांच्यासह अनेकांना धक्का बसला आहे.

बाजू मांडणार
व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सुरु असलेल्या चौकशीत अपेक्षित सहकार्य करूनही झालेली बदली अनपेक्षितपणे झाली आहे. याबाबत आपण वरिष्ठांकडे आपली बाजू मांडणार असून प्रसंगी कोर्टात जाणार असल्याचे शरद शेळके यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: Kalamba Jail Superintendent Shekel transferred

संबंधित बातम्या

Saam TV Live