VIDEO | एकदा पाहाच! काळे मास्तरांची ही निवडणुकीतली गाजलेली स्टाईल...

साम टीव्ही
शनिवार, 5 डिसेंबर 2020

निवडणुका झाल्या... निकाल बी लागलं... 
निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका वाजला. 
भाजपचा बार फुसका राहिला. आता निवडणुका म्हणलं की कोण हारणार अन् कोण जिंकणार. 

वर्धा : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचं पानीपत केलं. पण या सगळ्या निवडणुकीत एक मास्तर चांगलेच गाजले. ते म्हणजे कराळे गुरुजी.. आपल्या हटके स्टाईलमुळे ओळख निर्माण केलेल्या गुरुजींनी निवडणूक लढवली अन् मग पुढं काय झालं?. वाचा तुम्हीच

निवडणुका झाल्या... निकाल बी लागलं... 
निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका वाजला. 
भाजपचा बार फुसका राहिला. आता निवडणुका म्हणलं की कोण हारणार अन् कोण जिंकणार. 

पण प्रत्येक निवडणुकीत एक तरी उमेदवार असा असतो ज्याची चर्चा हारल्यावर बी हुती. असाच एक उमेदवार म्हणजे  कराळे मास्तर.

सगळ्या पोट्ट्यांना युट्यूबर धडे देणाऱ्या मास्तरांनी निवडणूकीचा चांगलाच धडा घेतला. अन् विरोधकांना बी दिला. कोणत्याच पूर्व तयारीनं न उतरलेल्या मास्तरांनी 7000 मतं मिळवून विरोधकांना घाम फोडला. पण मास्तरांनी शिकल्या सवरलेल्या मतदारांनाची दणक्यात शाळा बी घेतली. आणि महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत हे मास्तर चांगलेच गाजले.

का बे इसरले का ? जुनी पद्धत 
शिक्का मारायचे ना नीट हो ... 

मास्तर लय पॉझिटीव्ह राव. निवडणुकीत हारलं तरी गम नाय. उलट आपण कसा लडलो याची रंगतदार कथाच मास्तरांनी सांगून टाकली.

निवडणुकीत विजयाच्या गुलालानं मळवट भरणारे अनेक उमेदवार असतात राव पण हारून पण समोर येऊन सकारात्मक विचार करणारे कराळे मास्तर सारखे थोडे थोडकेच असतात. 

मास्तर यंदा निकाल लागला तो लागू द्या पुढ्या बारीनं जोरदार तयार करा .. बाकी मतदार राज कौल देईलच की... 


संबंधित बातम्या

Saam TV Live