कळकराई गावाचं फॉरेस्ट मॉडेल व्हिलेज होणार

SAAM TV
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

काळकराई गावाचा मॉडेल फॉरेल्ट व्हिलेज म्हणून विकास करणार
पुण्याचे वनाधिकारी राहुल पाटील यांची माहिती साम टीव्हीच्या बातमीनंतर वनविभागाची विशेष योजना


 

काळकराईची बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर प्रशासनानं तातडीनं पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. काळकराई पूर्ण बदलणार असून मॉडेल फॉरेस्ट व्हिलेज म्हणून काळकराईचा विकास केला जाणार आहे.

पुणे आणि राय़गड जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम अशा कळकराई गावची दुर्दशा साम टीव्हीनं जगासमोर मांडली. साम टीव्हीच्या बातमीनंतर आता सरकारी यंत्रणा कामाला लागल्यात. या गावाला जोडणारा रस्ता अलिबाग आणि पुण्याच्या फॉरेस्टच्या जागेतून काढण्यात येणार आहे. लवकरच हे गाव मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार वनविभागानं केलाय.

 फक्त रस्ता करुन वनविभाग थांबणार नाही. गावकऱ्यांना कळकराई गावातच रोजगार मिळवून देण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. मधमाशी पालनाच्या व्य़वसायासाठीही प्रोत्साहन दिलं जाणार आहे. जंगलातल्या औषधी वनस्पतींनाही बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विकासकामं करुन कळकराईला मॉडेल फॉरेस्ट व्हिलेज करण्याचा मानस वनविभागाचा आहे. 

 दुसरीकडं कळकराई गावात विकासगंगा नेण्यासाठी आवश्यक ती सर्व कामं करणार असल्याची ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत.

काळकराई गावात आता फक्त रस्ताच होणार नाही. तर गावात मोठ्या प्रमाणात विकासकामंही होणार आहेत. साम टीव्हीच्या विधायक पत्रकारितेमुळं कळकराई गावचा प्रवास अविकसीत गावाकडून मॉडेल फॉरेस्ट व्हिलेजकडं झालाय.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live