कल्याण मध्ये वापरलेले पीपीई किट, मास्क, इंजेक्शन आढळले कचराकुंडीत...

प्रदीप भणगे
मंगळवार, 13 एप्रिल 2021

हा घाणेरडा प्रकार कोणी केला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजलेली नाही.कल्याण पश्चिमेच्या स्टेशन रोडवर सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या समोर रस्त्यावर कचरा टाकला जातो. त्यामध्ये कचरा वेचण्यासाठी आलेल्या व्यक्तीला याठिकाणी वापरलेले हँडग्लोव्हज, मास्क, पीपीई किट इंजेक्शन आदी वस्तू आढळून आल्या आहेत. 

कल्याण : वाढत्या करोनाचा Corona प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना सुरक्षित नियम पाळण्याचे आदेश दिले जात असताना व एकीकडे कल्याण Kalyan पश्चिमेला रेकॉर्ड ब्रेक  कोरोना रुग्णांची संख्या आढळून आली असतानाच स्टेशन रोडवर असणाऱ्या कचराकुंडीत वापरलेले पीपीई किट, मास्क, इंजेक्शन आणि हँडग्लोव्हज PPE kits masks injections handgloves आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी कचरा वेचण्यासाठी आलेल्या व्यक्तीला या सर्व गोष्टी कचऱ्यात टाकलेल्या आढळून आल्या आहेत. In kalyan discarded PPE kits masks injections were found in the garbage

मात्र हा घाणेरडा प्रकार कोणी केला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजलेली नाही.कल्याण पश्चिमेच्या स्टेशन रोडवर सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या समोर रस्त्यावर कचरा टाकला जातो. त्यामध्ये कचरा वेचण्यासाठी आलेल्या व्यक्तीला याठिकाणी वापरलेले हँडग्लोव्हज, मास्क, पीपीई किट इंजेक्शन आदी वस्तू आढळून आल्या आहेत. 

तसेच त्यात एका डेंटिस्टने लिहिलेला औषधांचा कागदही सापडला आहे. मात्र, हा घाणेरडा प्रकार नेमका कोणी केला आहे.याची अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही. आधीच कल्याण पश्चिमेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून अशा प्रकारामूळे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत कल्याण डोंबिवली Kalyan Dombivli महापालिकेला देखील माहिती देण्यात आली असून ते संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live