कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांचा पाणी प्रश्न सुटणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

प्रदीप भणगे
मंगळवार, 6 एप्रिल 2021

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या सत्तावीस गावांमध्ये सध्या पाणी ,कचरा ,रस्ते यांच्या समस्या गंभीर निर्माण झाल्या आहेत

कल्याण : कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रातील सत्तावीस गावांमध्ये सध्या पाणी, कचरा, रस्ते यांच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी २७ गावांच्या समस्या उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. 27 Village Water Case Kunal Patil meet Ajit Pawar

- औरंगाबाद प्रशासनाचा अजब कारभार; निर्बंध कडक केलेत की टार्गेट दिलंय?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमधील नागरिकांना फक्त आश्वासने देण्यात आली आहेl, मात्र आश्‍वासनांची पूर्तता अजून झाली नसल्याने, नागरिक देखील संतापले आहेत. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तसेच या नागरिकांना कचरा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचाही सामना करावा लागत आहे. 

- ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांची दीड वर्षात विकेट!

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि २७ गावांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. उपमुख्यमंत्री पवार (Ajitdada Pawar) यांनी पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले. आणि यासंबंधी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन, लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

(Edited By - Digambar Jadhav)


संबंधित बातम्या

Saam TV Live