कल्याणचा पत्रीपूल अखेर वाहतुकीसाठी खुला मात्र शीळ फाट्यावरील वाहतूक कोंडीचं काय?

साम टीव्ही
मंगळवार, 26 जानेवारी 2021

 

  • कल्याणचा पत्रीपूल अखेर वाहतुकीसाठी खुला
  • कल्याणकरांचा प्रवास झाला सुखकर 
  • शीळ फाट्यावरील वाहतूक कोंडीचं काय ?

मुंबई : वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेला पत्रीपुल वाहतुकीसाठी खुला कऱण्यात आलाय. त्यामुळे कल्याणकरांचा प्रवास  सुखकर झालाय. मात्र शीळफाट्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका कधी असा सवाल डोंबवलीकर विचारतायत.

कल्याणकर ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते. तो क्षण अखेर तब्बल 26 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आला. पुत्री पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या पत्रीपुलामुळे कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

ब्रिटिशकालीन पत्रीपुलावर १८ नोव्हेबर २०१८ला रेल्वेकडून हातोडा मारण्यात आला. तेव्हापासून नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावं लागतं होतं. रस्ते विकास महामंडळाकडून ३६ कोटी रुपयांच्या निधीतून नवा ११० मीटर लांबीचा पत्रीपूल तयार करण्यात आला २०२० मध्येच पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र लॉकडाऊनमुळे पुलाचं बांधकाम जवळपास ३ महिने थांबलं होतं. त्यामुळे पुलाचं काम पूर्ण होण्यास २०२१ उजाडलं.

पत्रीपुलामुळे कल्याणकरांचा प्रवास सुखकर झाला असला तरी डोंबिवलीकरांची मात्र शिळ फाट्यावर होणाऱ्या ट्रफिक जॅममधून सुटका झालेली नाही. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा एकमेव महामार्ग असल्यानं शिळ फाट्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच. त्यातच भुयारी मार्ग,उड्डाणपूल तसंच सर्व्हिस रोडची काम सुरु असल्यानं आणखी भर पडतंय. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून आमची सुटका कधी? असा सवाल डोंबवलीकर विचारत आहेत.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live