कंगनाला केंद्राक़डून Y दर्जाची सुरक्षा, ठाकरे विरूद्ध कंगना वादात केंद्राची उडी?

साम टीव्ही
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

 

  • कंगनाला केंद्राक़डून Y दर्जाची सुरक्षा
  • शिवसेनेच्या धमकीनंतर कंगनाभोवती सुरक्षाकडं 
  • ठाकरे विरूद्ध कंगना वादात केंद्राची उडी ?

कंगना विरूद्ध ठाकरे या वादात आता केंद्रानं उडी घेतलीय. शिवसेनेकडून कंगनाला मुंबईत येण्याचं आव्हान दिलं जात असताना दुसरीकडे केंद्रानं तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवलीय. त्यामुळे कंगनाच्या निमित्तानं अमित शहा आणि ठाकरे पुन्हा एकदा आमने सामने आलेत. 

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर कंगनाच्या टिवटरवॉरवरून शिवसैनिक चांगलेच भडकलेत. कंगनानं शिवसेनेला थेट आव्हान दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही कंगनाला कडक भाषेत सुनावलं. शिवसैनिकांनी ठिकठिकाणी निदर्शनं केली. इतकच नाही तर कंगनानं मुंबईत येऊन दाखवावं असं आव्हानच शिवसेना नेत्यांनी दिलं. त्यानंतर आता कंगनाला केंद्रानं थेट Y दर्जाची सुरक्षा दिलीय. 

 

  • VIP, VVIP दर्जाच्या लोकांना केंद्राकडून पुरवली जाते Y दर्जाची सुरक्षा
  • कंगनाच्या सुरक्षेसाठी 11 जवान असतील
  • 11 पैकी एक ते दोन कमांडोज, 2 PSO आणि उर्वरीत जवान असतील
  • वर्षभरात 11 लोकांना केंद्राकडू Y दर्जाची सुरक्षा

दर्जाची सुरक्षा कुणाला द्यावी याचे सर्वस्वी अधिकार केंद्रीय गृहमंत्रालयाला आहेत. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठीच अमित शहांनी कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देऊ केली का असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे. 

 कंगना प्रकरणावरून शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने सामने आलेत. कंगनानं शिवसेनेला आव्हान दिलंय. तर भाजपकडून कंगनाची पाठराखण केली जातीय. त्यातच आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आल्यानं शिवसेनेसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live