कंगनाला गर्दीत एकाने नको तिथे काढला चिमटा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नवी दिल्लीः मला गर्दीमध्ये एकदा एकाने नको त्या ठिकाणी चिमटा काढला आणि निघून गेला. हा अनुभव आठवला तरीही किळस येऊन घृणा वाटते, असा किळसवाणा अनुभव अभिनेत्री कंगना राणावतने सांगितला आहे.

नवी दिल्लीः मला गर्दीमध्ये एकदा एकाने नको त्या ठिकाणी चिमटा काढला आणि निघून गेला. हा अनुभव आठवला तरीही किळस येऊन घृणा वाटते, असा किळसवाणा अनुभव अभिनेत्री कंगना राणावतने सांगितला आहे.

कंगनाचा अभिनय असलेला मणिकर्णिका हा चित्रपट लवकरच प्रसिद्ध होत आहे. या पार्श्वभूमिवर एका वृत्तसंस्थेशी बोलताना कंगना राणावत म्हणाली, मला तो किळसवाणा प्रकार आठवला तरी घृणा वाटते. गर्दीमध्ये एकाने मला नको त्या ठिकाणी चिमटा काढला. अंधार असल्यामुळे मला कोणी हा प्रकार केला ते समजले नाही. परंतु, तो अतिशय किळसवाणा प्रकार होता. त्यांना नेमके काय हवे असते अन् असे केल्यामुळे काय मिळते. पण, मला प्रश्न पडला आहे की महिला सुरक्षित कोठे आहेत. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी स्वतःच घेतली पाहिजे व सुरक्षित असलेल्या ठिकाणीच जायला हवे.'

#MeToo या मोहिमेत आता अभिनेत्री कंगना राणावतने तिला आलेला एक किळसवाणा अनुभव सांगितला आहे. कंगनाने क्वीन या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. विकासने आपल्याशी असभ्य वर्तन केले, असे कंगनाने त्यावेळी म्हटले होते. परंतु, #MeToo मोहिमेमुळे अनेक लोक आता मुलींशी, महिलांशी, अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करताना विचार करतील. कारण आता या गोष्टी महिला पुढे येऊन सांगत आहेत. त्यासंदर्भात तक्रार दाखल केली जाते आहे, ही या मोहिमेची सकारात्मक बाजू आहे. असेही कंगना म्हणाली.

तरुणींनी, महिलांनी स्वत:च्या रक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकले पाहिजे. यांसारख्या गोष्टींचा शाळेच्या अभ्यासक्रमातही समावेश करावा. स्वसंरक्षणासाठी महिलांनी समर्थ असले पाहिजे, असे अभिनेत्री राणी मुखर्जीने म्हटले होते. राणीचे म्हणणे बरोबर आहे, असेही कंगना म्हणाली.

Web Title: Kangana Ranaut I was pinched on my butt in the middle of a group


संबंधित बातम्या

Saam TV Live