जयललिता यांच्या बायेपिकमध्ये कंगना राणावत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 मार्च 2019

मुंबई - सध्या बॉलिवडूमध्ये बायोपिक्सचा ट्रेंड आहे. पंतप्रधान मोदींवरचा बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तर आता तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवला जात आहे. जयललितांच्या या बायोपिकमध्ये कंगना राणावत जयललितांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत ट्विट केले आहे. आज कंगनाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिने चाहत्यांना ही भेट दिली आहे.  

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, हा चित्रपट तामिळ भाषेत 'थलाइवी' तर हिंदी भाषेत 'जया' या नावाने प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटातील जयललिता यांच्या भूमिकेसाठी सुरुवातीला बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तेलुगू अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या नावांची चर्चा होती. परंतु, आता कंगनाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Web Title: Kangana Ranaut to Play Jayalalithaa in a Biopic on the Late Tamil Nadu CM

संबंधित बातम्या

Saam TV Live