VIDEO | कंगना राणावतचं डोकं ठिकाणावर आहे का? मुंबईनं नाव दिलं, त्याच मुंबईचा अवमान

साम टीव्ही
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

 

  • कंगना राणावतचं डोकं ठिकाणावर आहे का? 
  • मुंबईनं नाव दिलं, त्याच मुंबईचा अवमान
  • प्रसिद्धीसाठी कंगनाची ट्विटवर टिवटिव 

कंगना राणावतचं डोकं खरंच ठिकाणावर आहे का ? असं विचारण्याची खरोखऱच वेळ आलीय. ट्विटरवरून उठसूठ ट्विट करणाऱ्या कंगनाने नसता वाद ओढावून घेतलाय. मुंबईविरोधात अपशब्द वापरणाऱ्या कंगनाने आज पुन्हा ट्विट करत आव्हानाची भाषा केलीय. 

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी बॉलिवूडमधल्या दिग्गजांवर निशाणा साधणारी कंगना राणावत आता मात्र बेताल वक्तव्यांमुळे स्वत:च अडचणीत आलीय. बॉलिवूडसोबत सरकारवर निशाणा साधण्याच्या प्रयत्नात कंगनाची जीभ घसरलीय. तिनं मुंबईला थेट POKची उपमा दिल्यानं वादळ उठलंय. मुंबई पोलिसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते असं म्हणून तिनं स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. एव्ह्ढ्यावरच न थांबता तिनं आणखी एक ट्विट केलंय. 

लवकरच मी मुंबईत विमानतळावर येण्याची वेळही कळवेन...कुणाच्या बापाची हिंमत असेल तर मला रोखून दाखवा. कंगनाच्या ट्विटवरून शिवसेनेनं चांगलाच संताप व्यक्त केलाय. तर मुंबईच्या मुद्यावरून मनसेनंही कंगनाची कानउघडणी केलीय. 

कंगना रानावतच्या बेताल ट्विट्समुळे नेटीझन्सही वैतागले आहेत. दररोज 30 ते 40 हजार फॉलोअर्स कमी होतायेत. अनेकांनी कंगनाला वेड लागलंय असं म्हणून तिच्यावर टीका केलीय. तरीही कंगनाची टिवटिव सुरूच आहे. मुंबई असो वा मुंबई पोलिस...टीका करताना भान जपायला हवं हे कंगनासारख्या प्रतिभावान कलाकारांनी लक्षात घ्यायला हवं. अन्यथा कंगना आणि बोलभांड राखी सावंत यांच्यात फरक तो काय?
 


संबंधित बातम्या

Saam TV Live