कंगनाच्या अडचणी वाढल्या! सामाजिक तेढ निर्माण करत असल्याची याचिका

साम टीव्ही
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

कंगना राणावत समोरच्या अडचणी वाढल्यात. मुंबई पोलिसांनी कंगनाला दुसरी नोटीस दिलीय. चौकशीला हजर न राहिल्यास कंगनाच्या अडचणीत वाढ होणारेय.

कंगना राणावत समोरच्या अडचणी वाढल्यात. मुंबई पोलिसांनी कंगनाला दुसरी नोटीस दिलीय. चौकशीला हजर न राहिल्यास कंगनाच्या अडचणीत वाढ होणारेय

अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. मुंबई पोलिसांनी कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली या दोघींना दुसरी नोटीस पाठवलीय. नोटीसनुसार कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्य़ात आलंय. वांद्रे पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी एफआयआर दाखल आहे.

 वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगना रणौत हिच्यासह तिच्या बहिणीविरोधात FIR दाखल केली होती. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंगना राणावत पहिल्या नोटिसनंतर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहिली नव्हती. त्यामुळे आता अभिनेत्रीला दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे. 

मात्र जर आता कंगना आणि तिची बहिण रंगोली 10 तारखेला वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहिल्या नाहीत तर त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या नोटिशीनंतर कंगनाने सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा एकदा तिला नोटीस मिळाल्यानंतर तिची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live