कन्नड अभिनेत्री शनाया कटवेने केला स्वतःच्याच भावाचा खून

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 एप्रिल 2021

कन्नड अभिनेत्री शनाया कटवेला Shanaya Katwe तिचा भाऊ राकेश कटवे (वय ३२) Rakesh Katve याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राकेशचे तुकडे केलेले डोके देवरागुडीहल वनक्षेत्रात Devragudihal Forest सापडले​

मुंबई:  कन्नड अभिनेत्री शनाया कटवेला Shanaya Katwe तिचा भाऊ राकेश कटवे (वय ३२) Rakesh Katve याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राकेशचे तुकडे केलेले डोके देवरागुडीहल वनक्षेत्रात Devragudihal Forest सापडले. तर उरलेल्या शरीराच्या अवयवांची गडाग रोड आणि कर्नाटकातील Karnatak हुबळी भागातील इतर भागांमध्ये विल्हेवाट लावण्यात आली होती. Kannada actress Shanaya Katve got arrested For Brothers Murder

एका वृत्तानुसार, पोलिसांना शनाया कटवेचा Shanaya Katve राकेशच्या हत्येशी Murder संबंध असल्याचा संशय आला होता. योग्य दुवा मिळाल्यानंतर पोलिसांनी २२ एप्रिलला तिला अटक केली. या वृत्तानुसार सांगण्यात येत आहे आरोपी शनायाचे तिच्यासोबत असलेल्या दुसरा आरोपी नझिया अहमद कटिगारशी प्रेमसंबंध होते. शनायाचे प्रेम प्रकरण तिचा भाऊ राकेश याला ते मान्य नव्हते. म्हणून नाझिया अहमद कटिगारने त्याला ठार मारण्याचा कट रचला.

शनायाने तिच्या आगामी चित्रपटाच्या Movie प्रमोशनसाठी हुबळी Hubali या ठिकाणी भेट दिली होती. आणि त्याच दिवशी ही हत्या त्यांच्या घरात घडली होती. राकेशचा गळा आवळून खून करण्यात आला होता. खुनाच्या एक दिवसानंतर, कटिगार आणि त्याच्या मित्रांनी त्याचे शरीर कापले आणि त्याचे तुकडे शहरातील आणि आसपासच्या ठिकाणी फेकून दिले.

Edited by-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live