शटअप! म्हटल्यानंतरही कपिलने केला गर्लफ्रेण्डशी विवाह

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

 

जालंधर : कामेडी किंग कपिल शर्मा याची गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथ हिच्या वडिलांनी कपिल शर्माला शटअप म्हणून विवाहास नकार दिला होता. सासऱयाने केलेल्या अपमानानंतरही कपिल शर्मा गिन्नी चतरथ हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. लग्नात कपिल आणि गिन्नीच्या कुटुंबीयांसह मित्रमंडळी उपस्थित होते. बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटींसाठी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

जालंधर : कामेडी किंग कपिल शर्मा याची गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथ हिच्या वडिलांनी कपिल शर्माला शटअप म्हणून विवाहास नकार दिला होता. सासऱयाने केलेल्या अपमानानंतरही कपिल शर्मा गिन्नी चतरथ हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. लग्नात कपिल आणि गिन्नीच्या कुटुंबीयांसह मित्रमंडळी उपस्थित होते. बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटींसाठी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे.

पंजाबी विधीनुसार कपिल आणि गिन्नीचा विवाह पार पडला. जालंधरमध्ये कपिलचे घर आहे. त्यामुळे त्याने तिथेच विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचा सोहळा 10 डिसेंबरपासून सुरु झाला होता. गिन्नीच्या घरी मेहंदी आणि संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांनी लग्नासाठी शाही लूकला पसंती दिली होती. कपिलने एमरल्ड ग्रीन रंगाची शेरवानी निवडली होती, ज्यावर सोनेरी कलाकुसर केली होती. शिवाय, डोक्यावर पगडी आणि हातात तलवार असा त्याचा लूक होता. गिन्नीने पारंपरिक लाल रंगाच्या लेहंगा परिधान केला होता. 14 डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी 24 तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर गिन्नी चतरथ हिच्या वडिलांनी कपिल शर्माचा अपमान केला होता. यानंतर कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पुढे मात्र अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. गेल्या वर्षी कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेकदा वादांत सापडला. कॉमेडी नाईट्स विथ कपिलमधील सहकलाकार सुनील ग्रोवरशी खटके उडाल्याने कपिल वादाच्या भोवऱ्यात अडकला. कपिलने अनेक वेळा शेवटच्या क्षणी शूटिंग रद्द केली होती. त्यामुळे अजय देवगन, शाहरुख खान, इम्रान हाश्मीसारख्या बड्या कलाकारांना ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतर सोनी वाहिनीवर 'द कपिल शर्मा शो'लाही नारळ देण्यात आला. कपिलची प्रकृती बिघडल्यामुळे 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' हा नवा शोसुद्धा अवघ्या तीन एपिसोडमध्ये गुंडाळण्यात आला होता. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आणि विवाहबद्ध झाला. कपिल लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे.

Web Title: Kapil Sharma Marries Ginni Chatrath In Jalandhar


संबंधित बातम्या

Saam TV Live