कोरोना मातांच्या २५५ पिलांचा सांभाळ करणाऱ्या कराडच्या 'नाईटिंगेल'

Karad Krishna Hospital Nurse Feeding Infant
Karad Krishna Hospital Nurse Feeding Infant

कराड : कोरोनाच्या Corona काळात माणसांची अनेक रुपे समोर आली. त्यात काही वाईट होती तर काही चांगली होती. असचं माणुसकीचं मन हेलावणारं रुप कराडच्या कृष्णा रुग्णालयात Krishna Hospital  बघायला मिळत आहे. कोरोनाच्या काळात या हाॅस्पीटलमध्ये कोरोना पाॅझीटीव्ह Corona Positive असणारया २५५ महिलांनी बाळांना जन्म दिला, मात्र त्या स्वतः पाॅझीटीव्ह असल्याने त्यांना बाळांना संभाळता येत नव्हते. अशावेळी त्यांच्या पिल्लांना हाॅस्पिटलमधल्या नर्सेसनी Nurses संभाळलं. Karad Krishna Hospital Nurses took Care of Two Hundred Fifty Five infants

कोरोना काळात अनेक अडचणींना समोरे जावं लागलं. या रोगातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे याची लागण झाली की कोणत्याही नातेवाईकाला रुग्णांबरोबर राहता येत नाही. या रोगाने अनेक गर्भवती महिलांनाही सोडलं नाही. त्यामुळे लागण झाली असताना बाळाला जन्म दिला की हे बाळ त्यांच्याबरोबर ठेवता येत नाही. त्या आईच्या हातात बाळाला दिलं जाऊ शकत नाही. त्यातच कोणताही नातेवाईक ही त्या बाळाच्या जवळ जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. 

कराडच्या कृष्णा रुग्णालयत २२५ महिलांनी कोरोनाची लागण झाली असताना बाळांना जन्म दिला. या बाळांना सांभाळायचे कुणी हा प्रश्न होता मात्र हाॅस्पिटलमधल्या नर्सनी याची जबाबदारी घेतली. या छोट्याशा पिल्लांना आठ- दहा दिवस या नर्सेसनी आपल्या पंखाखाली घेतले आणि जपलं. Karad Krishna Hospital Nurses took Care of Two Hundred Fifty Five infants

कृष्णा हाॅस्पिटलच्या व्यवस्थापनाने कोविडचा ताण असताना देखिल ह्या महिला पूर्ण कोरोनामुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या पिल्लांची जबाबदारी घेतली. यासाठी लागणारे मनुष्यबळही पुरवले. त्यामुळे ह्या स्टाफचं काम अभिमानस्पद आहे.कोरोनात माणुसकीच्या अनेक रुपांपैकी हे एक आगळं रुप.... या दिवसांसाठी या पिल्लांना दिलेली मातृत्त्वाची ऊब अमुल्य आहे.

हे देखिल पहा

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com