बेबोच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण,बेगम करिना आणि नवाबी सैफ यांचा हटके अंदाज

सिध्दी सोनटक्के
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

सैफ अली खान आणि करिना कपूर खान बॉलिवूड इंडस्टीतील  मोस्ट पॉप्युलर आणि चार्मिंग कपल्सपैकी एक मानले जातात. या दोघांमध्ये असलेली रोमान्टीक केमिस्ट्री सा-यांच्याच पसंतीस पात्र ठरते. 16 ऑक्टोबर 2012 दिवशी दोघेही लग्नबंधनात अडकले.
डोळे दिपवणा-या नवाबच्या राजेशाही लग्नाची लगबग पाहायला मिळाली.इंडस्ट्रीतील मित्र मंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न थाटात पार पडले.  बेगम करिना आणि नवाबी सैफ यांचा अंदाजही तितकाच खास होता. दोघेही रॉयल अशा अंदाजात यावेळी पाहायला मिळाले होते.  

या लग्नाच्या निमित्ताने सैफचा नवाबी थाट-शान पुन्हा एकदा सा-यांनी अनुभवला होता. लग्नाच्या सात वर्षानंतरही दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री आजही कायम आहे.  आजही जेव्हा जेव्हा दोघे एकत्र येतात तेव्हा  प्रत्येकाची नजर फक्त सैफीनावरच खिळलेल्या असतात.
सोशल मीडियावर सैफीनाच्या शाही  लग्न सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून सारेच नवाबांची बात न्यारी... नवाबांचे थाट काही औरच.. अशाचे प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: On Kareena Kapoor and Saif Ali Khan's anniversary

संबंधित बातम्या

Saam TV Live