VIDEO| अंडरवर्ल्डचा पहिला डॉन करीम लाला 

ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

 मायानगरी मुंबईवर एकेकाळी अंडरवर्ल्डचं वर्चस्व होतं. या अंडरवर्ल्डचा पहिला डॉन होता करीम लाला...हाजी मस्तानच्या आधीही मुंबईवर  कुणाची दहशत असेल तर ती करीम लालाची..मुंबई डॉकवरून हिऱ्यांची आणि सोन्या चांदीची तस्करी करण्यात करीमलालाचा हातखंडा होता. काळ्या दुनियेतला हा डॉन गरिबांसाठी मसिहा असल्याचं म्हंटलं जायचं. त्याच्याकडे मदत मागण्यासाठी आलेली व्यक्ती कधीही रिकाम्या हाती परतली नाही असाही त्याचा एक नावलौकिक होता. 

अफगाणिस्तानात जन्मलेला करीम पश्तून समुदायाचा शेवटचा राजा मानला जातो. संपन्न परिवारातील करीम लाला व्यापाराच्या निमित्तानं पेशावरमार्गे मुंबईत आला. त्यानंतर त्यानं मुंबई डॉकवर हिरे आणि सोन्या-चांदीची तस्करी सुरू केली. फार थोड्या कालावधीत त्यानं या काळ्या धंद्यात आपली पकड मजबूत केली आणि अफाट पैसा कमवला. 
 हा तोच करीम लाला आहे ज्यानं दाऊद इब्राहिमला सर्वांसमोर बेदम चोप दिला होता, ज्याची मुंबईत आजही चर्चा होते. 80 च्या दशकात करीमलाला आणि दाऊद इब्राहिम एकमेकांचे जानी दुश्मन बनले...1981 साली करीमलालाच्या पठाण गँगनं दाऊदचा भाऊ शब्बीरची हत्या केली आणि तिथूनच अंडरवर्ल्डच्या रक्तरंजित इतिहासाला सुरूवात झाली. पुढं दाऊदनं हळहळू पठाण गँग संपवली. 90 चं दशक उजाडता उजाडता मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगतातून करीमलालाचं नाव नामशेष झालं आणि दाऊन नावाचा नवा डॉन पुढे आला. पुढे 2002 साली वयाच्या 90 व्या वर्षी करीमलालाचा मृत्यू झाला....

WebTittle:: Karim Lala, the first don of the underworld

संबंधित बातम्या

Saam TV Live